02 December 2020

News Flash

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत मतदानाचा विक्रम

यापूर्वी २००८ मध्ये बराक ओबामा निवडून आले त्या वेळी मोठे मतदान झाले होते.

(संग्रहित छायाचित्र)

 

अमेरिकेत अजूनही मतमोजणी सुरू असून २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत गेल्या पन्नास वर्षांतील उच्चांकी मतदान झाले आहे. यापूर्वी २००८ मध्ये बराक ओबामा निवडून आले त्या वेळी मोठे मतदान झाले होते. या वेळी अध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात गेलेला कौल मोठा आहे.

रविवारी जी आकडेवारी मिळाली ती पाहता मतदानास पात्र असलेल्यांपैकी ६२ टक्के लोकांनी मतदान केले.  २००८ पेक्षा यावेळचे मतदान ०.४ टक्क्य़ांनी अधिक झाले आहे. २००८ मध्ये ओबामा यांच्या रूपाने पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष देशाला मिळाला होता. मतदान जास्त झाले असले तरी त्याबरोबर देशाची लोकसंख्याही वाढलेली आहे, हा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही. आतापर्यंत १४ कोटी ८० लाख मतांची मोजणी झाली असून डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांना ७ कोटी ५० लाख मते मिळाली आहे.

ट्रम्प यांना सात कोटी मते मिळाली आहेत. पराभूत उमेदवाराला इतकी मते कधी मिळाली नव्हती हेही वास्तव सामोरे आले आहे. किमान १६ कोटी मतदान झाल्याचा अंदाज असून यानंतरही आकडे बदलण्याची शक्यता आहे. जेव्हा राज्ये मतदानाला वेळ वाढवून देतात तेव्हा मतदानावर त्याचा परिणाम होतो हे स्पष्ट झाले, कारण यावर्षी अनेक राज्यांनी मतदानाची वेळ वाढवली होती. ट्रम्प यांनी मतदानाच्या वाढीव वेळेला विरोध करून या वेळेतील मते बाद करण्यासाठी न्यायालयात दावे केले होते. असोसिएटेड प्रेस व युनायटेड स्टेटस इलेक्शन प्रोजेक्ट यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार १९६८ नंतर प्रथमच निवडणुकीचा उच्चांक झाला आहे.  तज्ज्ञांच्या मते विसाव्या शतकात एवढे मतदान कधी झाले नव्हते.

फ्लोरिडा विद्यापीठाचे मायकेल मॅकडोनाल्ड यांनी सांगितले,की यापेक्षा जास्त मतदान होऊ शकत नाही. काही राज्यांनी टपाली मतदानाचे नियम बदलले तेथे मतदान जास्त झाले आहे. मोंटाना, व्हेरमाँट येथे मतदान अनुक्रमे दहा व नऊ टक्के अधिक झाले. हवाईत १४ टक्के मतदान अधिक झाले. टेक्ससमध्ये टपाली मतदानाची वेळ वाढवली नव्हती तेथे ९ टक्के अधिक मतदान झाले. अ‍ॅरिझोना, टेक्सस, जॉर्जिया या राज्यात मतदान वाढले आहे. तेथे डेमोक्रॅटिक पक्षाला नवे मतदार गवसले आहेत. लोकांना मतदानाचे आवाहन केले तर ते करतात असे निरीक्षण राजकीय विषयातील तज्ज्ञ व  डेनव्हरचे प्राध्यापक सेठ मॅस्केट यांनी म्हटले आहे. जास्त मतदान नेहमीच डेमोक्रॅटिक प क्षाला फायद्याचे ठरत नाही. या निवडणुकीत सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला फारशा जागा मिळवता आल्या नाहीत. जॉजियावर आता सिनेटचे भवितव्य विसंबून आहे. एकही राज्य विधानसभा  डेमोक्रॅटसना रिपब्लिकनांच्या ताब्यातून खेचता आली नाही. तरुण व अश्वेत मतदारांनी डेमोक्रॅटिक पक्षाला मते दिली असे त्यांच्याच पक्षाचे विदा तज्ज्ञ टॉम बोनियर यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 12:02 am

Web Title: voting record in the us presidential election abn 97
Next Stories
1 बायडेन यांचा पहिला निर्णय : Covid Task Force स्थापन; डॉ. मूर्ती यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी
2 ‘पीडीपी’ला सोडचिठ्ठी दिलेल्या ‘त्या’ तिन्ही नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
3 “कमला हॅरिस हिंदू राष्ट्रवादाच्या विरोधात, मोदींनी त्यांची खुशमस्करी करु नये”; भाजपा खासदाराचा घरचा आहेर
Just Now!
X