News Flash

राज्यसभेच्या ५८ जागांसाठी निवडणुकीची घोषणा; २३ मार्चला होणार मतदान

केरळच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकही होणार

No Confidence Motion in Lok sabha: आत्तापर्यंत लोकसभेत एकूण २६ वेळा अविश्वास प्रस्ताव सादर झाला आहे. शुक्रवारी मोदी सरकारविरोधातील प्रस्ताव सभागृहात चर्चेसाठी येताच हा आकडा २७ वर पोहोचणार आहे.

संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतील ५८ सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल-मेमध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे या जागांसाठी निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने शुक्रवारी केली असून २३ मार्च रोजी यासाठी मतदान होणार आहे.

देशातील १६ राज्यातील राज्यसभेच्या ५८ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारिख १२ मार्च आहे. तर २३ मार्च रोजी यासाठी मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकांदरम्यान केरळमधील राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक देखील घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 8:51 pm

Web Title: voting to be held on march 23 for elections to 58 rajya sabha seats from 16 states last date of filing nominations is march 12
Next Stories
1 H-1B व्हिसाचे नियम आणखी कठोर; भारतीय व्यावसायिकांच्या अडचणीत वाढ
2 Video : टॅक्सी चालकावर ‘मनसे स्टाईल’ कारवाई, रस्त्यावर उठाबश्या काढण्याची शिक्षा
3 दिल्ली पोलीस केजरीवालांच्या घरी, आप भाजपावर बरसली
Just Now!
X