नवी दिल्ली : आसाम, तमिळनाडू, केरळ या राज्यांसह पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीच्या प्रचारतोफा रविवारी थंडावल्या. या राज्यांत मंगळवारी मतदान होणार असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये मंगळवारी तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. आसामचा हा शेवटचा मतदान टप्पा असून, तमिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमध्ये मात्र एकाच टप्प्यात हे मतदान होईल.
आयोगाने ममतांचा दावा फेटाळला
पश्चिम बंगालमधील नंदीग्राम मतदारसंघात मतदानावेळी मतदान केंद्रावर बाहेरील व्यक्ती उपस्थित होत्या, हा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला. ममता यांचा आरोप तथ्यहीन असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 5, 2021 1:55 am