News Flash

‘व्यापम मधील दोषींची गय नाही’

मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यातील दोषी व्यक्तींची गय करणार नाही, असे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.

| August 3, 2015 05:24 am

मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यातील दोषी व्यक्तींची गय करणार नाही, असे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. मात्र काँग्रेसने केलेली त्यांच्या राजीनाम्याची मागणी मात्र फेटाळली.
ते म्हणाले की, व्यापम घोटाळ्यात २०१३ मध्ये आपणच पहिल्यांदा प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले होते. यातील गुंतागुंत लक्षात घेऊन चौकशीसाठी विशेष पथक स्थापन केले व ते उच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष चौकशी पथकाच्या अंतर्गत काम करीत होते. दोन वर्षांपूर्वी विधानसभेत आपण हा घोटाळा झाल्याचे मान्य केले होते. व्यापममार्फत होणाऱ्या नेमणुकातील या घोटाळ्याची चौकशी चालू आहे. जो कुणी दोषी असेल त्याची गय केली जाणार नाही. जे कुणी कोठडीत आहेत त्यात काही राजकारणीही आहेत. कार्यकर्ते, नोकरशहा आहेत याचा अर्थ आम्ही काही लपवलेले नाही. उलट आम्ही पारदर्शक पद्धतीने चौकशी करीत आहोत पण आपण त्या प्रकरणात राजीनामा मात्र देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2015 5:24 am

Web Title: vyapam scam getting transparent probe done guilty wont be spare
टॅग : Vyapam Scam
Next Stories
1 मुल्ला मन्सूरची निवड वादग्रस्त
2 इजिप्त लष्कराकडून ८८ दहशतवादी ठार
3 इक्बाल मिर्चीच्या हवाला व्यवहारांची चौकशी
Just Now!
X