पोलीस ठाण्यात बदली झालेल्या नव्या पोलीस अधिकाऱ्याचे स्वागत करणे एका सरपंचाला महागात चांगलेच महागात पडले. कारण या सरपंचाला पोलीस ठाण्यात जाताच अटक करण्यात आली. मुजफ्फर नगरच्या शामली जिल्ह्यात असलेल्या प्रतापपूर गावात ही घटना घडली. इतवारी सिंग असे या सरपंचाचे नाव असून तो दोन गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता. तो पोलीस ठाण्यात बदली झालेल्या स्टेशन ऑफिसर राजकुमार शर्मा यांचे अभिनंदन करण्यासाठी आला होता तेव्हा आम्ही त्याला अटक केली. अशी माहिती सर्कल ऑफिसर राजेशकुमार तिवारी यांनी दिली.
सरपंच जेव्हा राजकुमार शर्मा यांचे अभिनंदन करण्यासाठी आला तेव्हा राजेशकुमार तिवारी यांना ही माहिती मिळाली की सरपंच इतवारी सिंगवर दोन गुन्हे दाखल आहेत. ही माहिती मिळताच तातडीने त्याला अटक करण्यात आली. पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी आणि एका बलात्कार प्रकरणात इतवारी सिंग पोलिसांना हवा होता. तो अभिनंदन करण्यासाठी आला आहे हे कळताच पोलिसांनी त्याला अटक केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2018 5:18 pm