07 April 2020

News Flash

महापौरांच्या मुलाने मारला डोळा, नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे धाव

बैठक सुरू असताना शिशिर माझ्याकडे बघून हसला आणि डोळा मारला.

महानगर पालिकेच्या बैठकीत महापौरांच्या मुलाने नगरसेविकाला डोळ्या मारल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित नगसेविकेने महापौरांकडे तक्रारही केली. पण महापौरांनी तुझी चुकी असल्याचे नगरसेविकाला सुनावले. त्यामुळे नगरसेविकेने थेट मुख्यमंत्र्यांकडेच धाव घेत यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

बिहारमधील पटना महानगर पालिकेच्या बैठकीत ही घटना घडली आहे. नगसेविका पिंकी देवी यांनी महापौर सीता साहू यांच्या मुलांविरूद्ध छेडछाडीचा आरोप केला आहे. पिंकी देवी म्हणाल्या, महानगर पालिकेची बैठक होती. यावेळी महापौरांचा मुलगा शिशिर कुमार नगरसेवक नसतानाही हजर होता. बैठक सुरू असताना शिशिर माझ्याकडे बघून हसला आणि डोळा मारला. मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण त्याने पुन्हा आपले वागणे सुरूच ठेवले. त्यामुळे हे थांबवल नाही तर तुझ्या आईकडे तक्रार करेल अशी धमकी दिली. पण तो घाबरला नाही. जे करायचे ते कर असे तो म्हणाल्याचे देवी यांनी सांगितले.

त्यानंतर पिंकी देवी यांनी महापौर सीता साहू यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यावर त्यानी मला माझीच चुक असल्याचे सुनावले. तुम्ही लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करता, असे त्या म्हणाल्याचे नगरसेविका पिंकी देवी यांनी सांगितले. याप्रकरणात देवी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे. महानगर पालिकेत महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. माझ्यासोबत जी घटना घडली इतर महिलांसोबत घडू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी देवी यांनी केली आहे. तसेच हा प्रकार थांबला नाही तर आपण महिला आयोग किंवा न्यायालयात जाऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2019 1:08 pm

Web Title: ward councilor alleges that son of municipal council mayor winked at her bmh 90
Next Stories
1 पी. चिदंबरम बेपत्ता; ईडीकडून लुकआऊट नोटीस जारी
2 पूरग्रस्तांना मदत करणारं हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू
3 कामांध प्रेयसीनं लावली झोपाळू प्रियकराच्या घराला आग
Just Now!
X