News Flash

..तर इराणच्या ५२ ठिकाणांवर हल्ला

अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांचा इशारा

(संग्रहित छायाचित्र)

 

इराणने लष्करी अधिकारी कासीम सुलेमानी याच्या हत्येचा बदला घेतल्यास त्या देशांतील ५२ ठिकाणांवर हल्ला करण्यात येईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

इराणचे मेजर जनरल सुलेमानी हे शुक्रवारी सकाळी बगदाद  विमानतळाजवळ अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात ठार झाले. यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. सुलेमान यांच्या हत्येचा बदला घेण्याचा निर्धार इराणने जाहीर केला. त्यावर ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतली.  अमेरिकेने इराणमधील ५२ ठिकाणे निश्चित केली आहेत. या ठिकाणांवर हल्ला करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 12:48 am

Web Title: warning us president donald trump iran abn 97
Next Stories
1 ‘जेएनयू’मध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला
2 नागरिकत्व कायद्याबाबत गैरसमज नकोत -राजनाथ सिंह
3 ‘नानकाना साहिब’वरील हल्ल्याचा इम्रान खान यांच्याकडून निषेध
Just Now!
X