News Flash

मुस्लिम मतांसाठी ममता बॅनर्जींची नवी खेळी

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील मुस्लिम मतदारांच्या दबावामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी अमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांची भेट घेण्यास नकार दर्शविला आहे.

| February 22, 2014 01:41 am

मुस्लिम मतांसाठी ममता बॅनर्जींची नवी खेळी

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील मुस्लिम मतदारांच्या दबावामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी अमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांची भेट घेण्यास नकार दर्शविला आहे. अमेरिकन राजदूतांची भेट घेतल्यास मुस्लिम समाजात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असल्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर ममता बॅनर्जी कोणताही धोका पत्कारण्यास तयार नाहीत. आगामी निवडणुकीत मुस्लिम मतांचे महत्व लक्षात घेता ममतांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र, याबाबत ममता बॅनर्जींना विचारले असता अमेरिकन राजदूत नॅन्सी पॉवेल यांच्याबरोबर आपली कोणतीही भेट ठरली नसल्याचे सांगितले. प्रसारमाध्यमांनी जाणूनबुजून याविषयी चुकीच्या बातम्या पसरवल्याचे ममता बॅनर्जींनी यावेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2014 1:41 am

Web Title: wary of muslim disapproval mamata doesnt meet us envoy
Next Stories
1 ‘एफसीआय’गोदामांमध्ये दारूसाठा नाही
2 मारेकऱ्यांच्या मुक्त करण्याच्या निर्णयावर केजरीवालांची टीका
3 पुढील दशक ‘संपवर्षां’चे ; भारतीय मजदूर संघाचा इशारा
Just Now!
X