06 March 2021

News Flash

शेतकरी नेत्यांच्या हत्येच्या कटाची कबूली देणाऱ्या आरोपीचा यू-टर्न; नवा व्हिडीओ आला समोर

शेतकऱ्यांवरच केला आरोप

आंदोलनस्थळी पकडण्यात आलेला आरोपी. (छायाचित्र/एएनआय)

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला नवं वळण लागलं आहे. शनिवारी रात्री आंदोलनस्थळी एका संशयित आरोपीला पकडलं होतं. त्या आरोपीनं चार शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. त्यामुळे शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्याच व्यक्तीचा नवा व्हिडीओ समोर आला असून, शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे माध्यमांशी बोललो, असा यू-टर्न आरोपीनं घेतला आहे.

आंदोलक शेतकऱ्यांकडून प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीची तयारी सुरू असताना शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट असल्याचा हा खळबळजनक प्रकार उजेडात आला होता. आंदोलन सुरू असलेल्या परिसरात पकडण्यात आलेल्या आरोपीने हत्येच्या कटाची कबूलीही दिली होती. ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट आहे, असं आरोपीनं म्हटलं होतं. मात्र, आता त्यानं आपल्या विधानांवरून यू-टर्न घेतला आहे.

त्याचा नवा व्हिडीओ समोर आला असून, इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार त्यांचं नाव योगेश आहे. त्याचा नवीन व्हिडीओ व्हायरल झाला असून, आपण शेतकऱ्यांनी जे बोलायला सांगितलं होतं. तेच बोललो. मात्र, हा व्हिडीओ अधिकृत असल्याचं अद्याप निष्पन्न झालेलं नाही. या तरुणाला सोनीपत पोलिसांनी शुक्रवारी अटक केलेली आहे.

शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट कसा रचला?

आरोपीनं संपूर्ण कटाचाही उलगडा केला होता. “आमचे दोन गट तयार केले होते. १९ जानेवारीपासून आंदोलनस्थळी आहे. शेतकरी सोबत शस्त्र बाळगतात का यांचा शोध घेण्याचं काम दिलं होतं,” असं आरोपीनं सांगितलं होतं. “२६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांना रोखण्यात येईल. त्यानंतर शेतकरी थांबले नाहीत. तर त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश होते. तर दुसरीकडे दहा जणांचा एक गट आहे. हा गट शेतकऱ्यांच्या रॅलीत सहभागी होऊन पाठीमागून गोळीबार करतील. जेणेकरून आंदोलक घाबरून पांगतील. त्याचबरोबर व्यासपीठावर जे चार लोक असतील, त्यांना गोळ्या घालण्याचा कट आहे. त्यांचे फोटो देण्यात आलेले आहे. ज्यानं आम्हाला हे सांगितलं, तो पोलीस आहे. त्याचं नाव प्रदीप सिंह आहे. राई ठाण्यात आहे. तो नेहमी चेहरा झाकून भेटायला यायचा,” अशी माहिती आरोपीनं दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 1:40 pm

Web Title: was reading script given by farmers masked man nabbed at singhu border makes u turn in new video bmh 90
Next Stories
1 लालू प्रसाद यादव यांच्या फुफ्फुसात पाणी, प्रकृती चिंताजनक; तेजस्वी घेणार नितीश कुमार यांची भेट
2 चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट; आंदोलनस्थळी आरोपीला पकडलं
3 नवसंजीवनी! हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी मानले आभार; म्हणाले,…
Just Now!
X