News Flash

व्हिडिओ: सुब्रमण्यम्‌ स्वामी यांच्या गाडीवर अंडी आणि शाईफेक

सुब्रह्मण्यम स्वामी आज नवाबगंज येथील व्हीव्हीएसडी महाविद्यालयात एका परिसंवादात उपस्थित राहण्यासाठी निघाले होते

कंपनी बाग चौकात पोचल्यानंतर त्यांच्या मोटारीवर काही आंदोलकांनी अंडे आणि टोमॅटो फेकले

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी कानपूर येथे भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या गाड्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वामी यांच्या गाडीवर अंडी, टोमॅटो आणि शाई फेकली. यावेळी पोलिसांनी केलेल्या सौम्य लाठीमारात आंदोलकांना किरकोळ दुखापत झाली. सुब्रह्मण्यम स्वामी आज नवाबगंज येथील व्हीव्हीएसडी महाविद्यालयात एका परिसंवादात उपस्थित राहण्यासाठी निघाले होते. दरम्यान कंपनी बाग चौकात पोचल्यानंतर त्यांच्या मोटारीवर काही आंदोलकांनी अंडे आणि टोमॅटो फेकले. याबाबत माहिती देताना त्यांच्या चालकाने सांगितले, “ते जखमी झालेले नाहीत. पण आंदोलकांनी मोटारीवर अंडे आणि टोमॅटो फेकले.‘ त्यानंतर आंदोलकांनी गाडीला घेराव घातल्याचेही चालकाने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2016 4:17 pm

Web Title: watch bjp leader subramanian swamy cavalcade pelted with eggs ink
टॅग : Attack
Next Stories
1 मी हल्लेखोराला ओळखूनही पोलिसांनी त्याला अटक केली नाही- कन्हैया कुमार
2 प्रवाशांना देण्यात येणारी ब्लँकेटस दोन महिन्यांतून एकदाच धुतली जातात; रेल्वे खात्याची कबुली
3 ‘फाळणी आणि बाबरी पतनानंतर गेल्या वर्षभरात भारतीय समाजाचे सर्वाधिक धुव्रीकरण’
Just Now!
X