News Flash

पाहा: मद्यपी पोलीस अधिकाऱयाचा भर रस्त्यात धिंगाणा

नागरिकांनाच या पोलीस अधिकाऱयाला सावरण्यासाठी मदत करावी लागत आहे.

कायदा हातात न घेण्याचे व नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणाऱया पोलीसांनी कायदा मोडला तर? नुकताच ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने एक व्हिडिओ जारी केला असून, या व्हिडिओमध्ये चक्क एक पोलीस अधिकारीच मद्यपान करून रस्त्यात धिंगाणा घालत असल्याचे दिसते. हा प्रकार कानपूर येथील असून, नशेत तर्ररर झालेल्या या पोलीस अधिकाऱयाला नीट उभे देखील राहता येत नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. नागरिकांनाच या पोलीस अधिकाऱयाला सावरण्यासाठी मदत करावी लागत आहे. नशेत धुंद झालेला हा पोलीस अधिकारी गणवेशात असून, उपस्थितांनी या तळीराम पोलीसाने घातलेल्या धिंगाण्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर शेअर केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2016 10:24 pm

Web Title: watch drunken cop creates a scene on kanpur road
Next Stories
1 सुषमा स्वराज यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
2 भारतीय प्राध्यापकाची अमेरिकेमधील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती
3 दृष्टीहिन विद्यार्थ्यांनी अॅक्रोबेटिक योगा करून केलं थक्क
Just Now!
X