News Flash

पाहा: भरधाव कार स्कुटीला धडकली

कारचा वेग इतका जास्त होता की स्कुटीवरील तरुणींना सावरायला अवधीच मिळाला नाही.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या एका अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.  या अपघातात एका भरधाव कारने स्कुटीला जोरदार धडक दिली. मात्र,  स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन तरूणी केवळ सुदैवाने वाचल्या. कारने दिलेली धडक इतकी जोरदार होती की तरुणी हवेत उडाल्या आणि कारच्या बोनेटवर आदळल्या. स्कुटीदेखील १० फुटाहून जास्त दूर फेकली गेली. सुदैवाने या तरुणी अपघातातून बचावल्या. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. दोन तरुणी अँगल थिएटरच्या दिशेने अॅक्टिव्हावर जात असताना अचानक भरधाव कारने त्यांच्या अॅक्टिव्हाला धडक मारली. कारचा वेग इतका जास्त होता की स्कुटीवरील तरुणींना सावरायला अवधीच मिळाला नाही. अपघातस्थळी लोक नसल्याने वाहनचालकाने अपघातानंतर गाडी अजिबात न थांबवता पळ काढला. दोन्ही तरुणींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधरावर पोलिस चालकाचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2016 7:05 pm

Web Title: watch horrific accident caught on camera in ahmedabad victims escape alive watch horrific accident mishap road accident loksatta loksatta news marathi marathi news
टॅग : Mishap
Next Stories
1 गांधी परिवाराचा इतिहास ऋषी कपूर यांना माहिती नाही – निरूपम
2 महिला डॉक्टरकडून रुग्णांना इस्लाम स्वीकारण्याचा सल्ला, तपासाचे आदेश
3 स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
Just Now!
X