News Flash

पाहा: लालुप्रसाद यादवांनी केली मोदींची नक्कल

भारतीय राजकारणात लालुप्रसाद यादव हे नाव अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. एक नेता म्हणून उत्स्फुर्त भाषण करण्याची हातोटी आणि विनोदी शैलीत विरोधकांना चिमटे काढण्यात लालुप्रसाद यांचा

| August 20, 2015 03:01 am

भारतीय राजकारणात लालुप्रसाद यादव हे नाव अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. एक नेता म्हणून उत्स्फुर्त भाषण करण्याची हातोटी आणि विनोदी शैलीत विरोधकांना चिमटे काढण्यात लालुप्रसाद यांचा हात कोणीही धरू शकणार नाही. याच लालुंनी बुधवारी बिहारमधील एका प्रचारसभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची अशी काही नक्कल केली की उपस्थितांची हसता पुरेवाट झाली. सध्या बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाकडून अनेक दावे- प्रतिदावे केले जात आहेत. नरेंद्र मोदींनीही काही दिवसांपूर्वी एका प्रचारसभेदरम्यान मोठा गाजावाजा करत बिहारला केंद्राकडून सव्वा लाख कोटींचे विशेष आर्थिक पॅकेज देण्यात आल्याची घोषणा केली होती. यावेळी तुम्हाला किती हवेत.. ५० हजार कोटी, ६० हजार कोटी, ७० हजार कोटी, ८० हजार कोटी की ९० हजार कोटी असे नेहमीच्या पद्धतीने विचारत मोदी यांनी सव्वा लाखांची मदत जाहीर केली होती. मोदींच्या याच वाक्याचा धागा पकडत लालुप्रसाद यादव यांनी अगदी  हातवाऱ्यांसकट मोदींची नक्कल करून दाखविली. एका क्षण तर असा आला की, ‘अरे मोदी जी ठिक से बोलो, नही तो नस फट जायेगी’, असे बोलत लालुंनी मोदींची खिल्ली उडविली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2015 3:01 am

Web Title: watch lalu prasad yadav hilarious mimicry of pm narendra modi
टॅग : Lalu Prasad Yadav
Next Stories
1 पचौरी यांना परदेशात जाण्यास न्यायालयाची परवानगी
2 महाविद्यालयास शत्रुघ्न सिन्हा यांच्या वडिलांचे नाव
3 आश्वासन पूर्ततेचे धैर्य नरेंद्र मोदींमध्ये नाही !
Just Now!
X