03 April 2020

News Flash

पाहा: ‘बाहुबली’चा पडद्यामागील अविश्सनीय प्रवास

'बाहुबली'मधील महिष्मतीचा भव्य दरबार आणि अवंतिकाचे नृत्य ही दृश्ये तर केवळ आणि केवळ तंत्रज्ञानाची कमाल असल्याचे या व्हिडिओत दिसते.

| September 1, 2015 01:27 am

यंदाच्या वर्षात एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक विक्रम प्रस्थापित केले. या चित्रपटाच्या यशाचे मुख्य कारण ठरले होते ते त्यामधील व्हीएफएक्स इफेक्टस. चित्रपटातील बहुतांश दृश्यांसाठी व्हीएफएक्सची मदत घेण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षक ‘बाहुबली’ बघताना चांगलेच थक्क झाले होते. मात्र, हे व्हीएफएक्स इफेक्टस देताना पडद्यामागची प्रक्रिया नेमकी कशी होती, हे पाहिल्यानंतर प्रेक्षक आणखीनच थक्क होतील. हैदराबादच्या मकुता व्हीएफएक्सने इंटरनेटवर नुकताच ‘बाहुबली’मधील व्हीएफएक्स इफेक्टस देण्याची प्रक्रिया उलगडणारा व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. ‘बाहुबली’मधील अनेक दृश्यांमागची व्हीएफएक्सची प्रक्रिया किती क्लिष्ट आणि अवघड होती, हे व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येते. काल्पनिक गोष्टी, आजुबाजुचा निसर्ग आणि अनेक बारीक बारीक तुकड्यांनी तयार होणारे दृश्य पाहतानाचा प्रवास खरचं थक्क करणारा आहे. ‘बाहुबली’मधील महिष्मतीचा भव्य दरबार आणि अवंतिकाचे नृत्य ही दृश्ये तर केवळ आणि केवळ तंत्रज्ञानाची कमाल असल्याचे या व्हिडिओत दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2015 1:27 am

Web Title: watch video baahubali vfx breakdown is as mesmerising as the movie
Next Stories
1 इंद्राणी पैशांसाठी काहीही करू शकते – सिद्धार्थ दास
2 सलमान खानचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणीस नकार
3 राजीव मेहरिषी नवे केंद्रीय गृहसचिव
Just Now!
X