योगगुरू रामदेवबाबा भाजपचे लोकसभा उमेदवार महेंत चांदनाथसोबत ‘पैशांची’ चर्चा करताना कॅमेरा कैद झाले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी रामदेवबाबा आणि उमेदवार यांच्यात झालेली छूपी चर्चा कॅमेराने टिपली आहे. या व्हिडिओमध्ये, भाजप उमेदवार निवडणुकीसाठी निधी जमा करण्यासाठी भरपूर अडचणी निर्माण होतात असे रामदेवबाबांना सांगताना दिसतो. यावर लगेच रामदेवबाबा हळूच सौम्य आवाजात, “अरे तू वेडा आहेस का? माध्यमांचे कॅमेरे आहेत येथे ही चर्चा करू नकोस.” असे म्हणत त्याला रोखल्याचे दिसते. त्यानंतर उमेदवार महेंत चांदनाथ यांनीही मिश्किल हास्य करत प्रसंग टाळला..
व्हिडिओ-