मध्य प्रदेशमधील होशंगाबाद येथे पेट्रोल पंप मालकाने दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्याला धडा शिकवण्यासाठी क्रुरतेचा कळस गाठला. कर्मचाऱ्याला पेट्रोल पंपावरील खांबाला बांधून त्याला चाबकाचे फटके दिल्याची घटना समोर आली असून सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
होशंगाबादमधील पेट्रोल पंपावर काम करणारा कर्मचारी आठवडाभर कामावर गेला नाही. नुकताच तो पुन्हा कामावर परतला. यानंतर पेट्रोल पंप मालकाने त्याला पंपावरील खांबाला बांधून चाबकाने फटके मारले. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
#WATCH: An employee at a petrol pump in Madhya Pradesh's Hoshangabad being thrashed with whip for not coming to work. Both accused arrested. Victim says, 'I met with an accident so didn't go to work for 5-6 days. Owner&his friend called me at pump&beat me'.(NOTE: Strong Language) pic.twitter.com/HjNaQa6Pte
— ANI (@ANI) July 6, 2018
‘माझा अपघात झाल्याने ५ ते ६ दिवस मी कामावर जाऊ शकलो नाही. पेट्रोल पंप मालक आणि त्यांच्या एका मित्राने मला फोन करुन भेटायला बोलावले आणि यानंतर मला मारहाण केली’, असे त्या कर्मचाऱ्याने सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 6, 2018 8:59 am