News Flash

व्हिडिओ: रोडरोमिओला तरुणीने पोलीस ठाण्यातच धुतले

मुलींची छेडछाड करणाऱया रोडरोमिओला एका मुलीने चांगलाच धडा शिकवला. या मुलीने छेडछाड करणाऱया तरुणाची कॉलर पकडून त्याला पोलीस ठाण्यातच चोप दिला.

| July 7, 2015 06:49 am

मुलींची छेडछाड करणाऱया रोडरोमिओला एका मुलीने चांगलाच धडा शिकवला. या मुलीने छेडछाड करणाऱया तरुणाची कॉलर पकडून त्याला पोलीस ठाण्यातच चोप दिला. घटनेचे चित्रीकरण देखील खुद्द पोलीस अधिकाऱयांनीच केले आहे.
अंकित राजपूत नावाचा मवाली तरुण मुलींसोबत अश्लील वर्तन आणि छेड काढत असल्याने परिसरातील मुली त्रस्त झाल्या होत्या. अखेर अंकितच्या विरोधात आवाज उठवत तरुणीने त्याला धडा शिकवण्याचे ठरविले. अंकित राजपूत बाईकवरून तिचा पाठलाग करत असताना ती पोलीस ठाण्याचा दिशेने गेली. पोलीस ठाणे जवळ येताच तिने टवाळखोर अंकीतची कॉलर पकडून त्याला बडवण्यास सुरूवात केली. त्याला फरफटत पोलीस ठाण्यात घेऊन जात तेथेही तरुणीने अक्षरश: चपलेने चोप दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2015 6:49 am

Web Title: watch video teen thrashes eve teaser inside up police station
Next Stories
1 व्यापमं घोटाळा हा किरकोळ विषय – सदानंद गौडा
2 ग्रीस संकटाचा भारतावर थेट परिणाम नाही!
3 ग्रीसमधील नागरिकांचा बेलआऊटविरोधात कौल
Just Now!
X