News Flash

इंटरनेटवर ‘पायरेटेड’ चित्रपट पाहणे गुन्हा नाही; मुंबई उच्च न्यायालय

नुकसान करण्यासाठी वितरण करणे, सार्वजनिकरित्या चित्रपट दाखवणे आणि विनापरवानगी विकणे किंवा भाड्याने देणे, हा गुन्हा होऊ शकतो, असे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी म्हटले आहे.

कॉपीराईट नियमाच्या उल्लंघनातंर्गत बंद केलेल्या युआरएलवर संदेश दाखवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

इंटरनेटवर पायरेटेड सिनेमा पाहणे हा कॉपीराईट अॅक्ट अंतर्गत गुन्हा नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. कॉपीराईट असलेले चित्रपट पाहणे गुन्हा नाही. परंतु नुकसान करण्यासाठी वितरण करणे, सार्वजनिकरित्या चित्रपट दाखवणे आणि विनापरवानगी विकणे किंवा भाड्याने देणे, हा गुन्हा होऊ शकतो, असे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी म्हटले आहे.
न्यायमूर्ती पटेल यांनी इंटरनेट पुरवठादार कंपनींना (आयएसपी) ‘एरर मेसेज’ वरून ‘viewing, dowloading, exhibiting or duplication a particular film is a penal offence’ ( चित्रपट पाहणे, डाऊनलोड करणे, दाखवणे किंवा त्याची कॉपी बनवणे दंडनीय अपराध आहे.) हा संदेश हटवण्यास सांगितले आहे. कॉपीराईट नियमाच्या उल्लंघनातंर्गत बंद केलेल्या युआरएलवर संदेश दाखवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने इंटरनेट पुरवठादार कंपन्यांना काही युआरएल ब्लॉक करण्यास सांगितले होते. यासंबंधी हिंदी चित्रपट ढिशूमच्या निर्मात्यांनी याचिका दाखल केली होती. इ-कॉमर्स वेबसाईटवर परिणाम होऊ नये म्हणून न्यायालयाने आयएसपीला ब्लॉक्ड वेबसाईट्सवर एरर मेसेज दाखवण्यास सांगितले होते. या संदेशात सर्व माहिती दिली जावी, असे न्यायालयाने म्हटले होते. परंतु टाटा कम्युनिकेशन्सने आपली बाजू मांडताना टाटा कम्युनिकेशन आणि इतर आयएसपी कंपन्यांच्या तांत्रिक मर्यादा असल्याचे सांगून ३२ केबीपेक्षा मोठा संदेश दाखवता येत नसल्याचे म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 1:54 pm

Web Title: watching pirated movies online not an offense says bombay high court
Next Stories
1 आसाराम बापूला जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाचा पुन्हा नकार
2 सुप्रीम कोर्टाकडून धोनीला दिलासा, फौजदारी कारवाई रद्द करण्याचे आदेश
3 VIDEO: त्या पोलीस अधिकाऱ्याने स्वत:वरच केली ‘टेसर गन’ची चाचणी
Just Now!
X