News Flash

पश्चिम बंगालचे बारावीचे निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात

आणखी उशीर न होण्यासाठी काळजी घेणार

पश्चिम बंगाल माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱया बारावीच्या परीक्षेचे निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहेत, ही माहिती मंडळातील अधिकाऱ्यांकडून नुकतीच देण्यात आली.

१२ वीच्या परीक्षेचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्याला काहीसा उशीर होत असल्याचे दिसते. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश घेताना त्रास होऊ नये यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोर्डाने सांगितले. त्यामुळे या निकालाला आणखी उशीर होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचे मंडळाने सांगितले.

मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचे निकाल १६ मे रोजी जाहीर करण्यात आले होते. ही परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेला ११.४ लाख विद्यार्थी बसले होते. हे निकाल विद्यार्थ्यांना wbresults.nic.in या वेबसाईटवर पाहता येतील, असेही मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 1:36 pm

Web Title: wbbse 12th results 2017 west bengal madhyamik pariksha result 2017 will be declared in first week of june
Next Stories
1 मच्छर हे दहशतवाद्यांसारखेच, त्यांना मारणे ही देशभक्तीच: भाजप मंत्री
2 Goa Board SSC Results 2017 : गोवा बोर्डाचे दहावीचे निकाल जाहीर
3 CBSE निकाल निश्चित वेळापत्रकानुसारच, प्रकाश जावडेकर यांचे आश्वासन
Just Now!
X