News Flash

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून मोदी धडा घेतील- सोनिया गांधी

मोदी सरकारने शेतकऱ्यांकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अरूणाचल प्रदेशमधली राष्ट्रपती राजवट हटवून देशाचे संविधान आणि लोकशाही अबाधित राखली आहे. उत्तराखंड आणि आता अरुणाचल प्रदेश या दोन महत्त्वाच्या निर्णयामुळे मोदी सरकार आता तरी यातून धडा घेईल असे म्हणत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त गुरूवारी नांदेडमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
मोदी सरकारने शेतकऱ्यांकडे साफ दुर्लक्ष केले आहे. देशात दुष्काळ पडलाय याची आठवण सरकारला करून द्यावी लागते. महिला, आदिवासी आणि बालकांसाठी ज्या योजना काँग्रेसने सुरू केल्या होत्या त्याकडेही आताचे सरकार दुर्लक्ष करते आहे. त्यामुळे कित्येक गरजूंना या योजनांपासून वंचित राहवे लागते आहे असं म्हणत त्या सरकारवर बरसल्या.
देशात शंकररावांसारखे नेते होऊन गेले. त्यांच्यासारख्या सच्च्या आणि प्रामाणिक नेत्याला शेतक-यांच्या प्रत्येक समस्येची जाण होती. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ते नेहमीच धावून जायचे. ते ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचा विचार करायचे तसा विचार मोदी सरकार करत नाही. शेतक-यांचे हे हाल पाहून त्यांना देखील दु:ख झाले असेत असंही सोनिया गांधी म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 3:39 pm

Web Title: we all are very proud of supreme court for protecting our constitution and democracy sonia gandhi
Next Stories
1 गरिबीमुळे तिने पोटच्या मुलाला ३००० रुपयांत विकले!
2 आता ई-आधार कार्डवरही मिळणार सीमकार्ड
3 Devyani Khobragde: देवयानी खोब्रागडे यांची रामदास आठवलेंच्या स्वीय सहाय्यकपदी नियुक्ती
Just Now!
X