अंदमानात उद्धव यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
अंदमानातील मराठी बांधवांच्या समस्या सोडवण्यास आम्ही कटिबद्ध असून याबाबत शिवसेना व इतर नेत्यांमधील फरक आम्ही दाखवून देऊ, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी लगावला.
विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर अंदमानातील महाराष्ट्र मंडळाला ठाकरे यांनी भेट दिली. त्यावेळी महाराष्ट्रातील
नेत्यांकडून केवळ आश्वासने दिली जातात. फडणवीस यांच्याकडेही आमदार असताना महाराष्ट्र मंडळाच्या व मराठी माणसाच्या समस्यांबाबतचा पाढा मांडला होता. मात्र आश्वासनांशिवाय आम्हाला काही मिळत नाही, याकडे मंडळाच्या सचिवांनी लक्ष वेधले. त्यावर ठाकरे म्हणाले,
सेना हा मराठी माणसाचा आवाज आहे. कुणी काही करो न करो आम्ही येथील मराठी माणसाला वाऱ्यावर सोडणार नाही. सावरकरांच्या स्मारकाबरोबरच मंडळासाठी जे शक्य आहे ते करू. या निमित्ताने आमच्यातला व इतर नेत्यांमधला फरक तुम्हाला कळेल. शिवसेना व मराठी माणसाचा आवाज कुणी दाबू शकत नाही.