News Flash

पुढचं दशक आव्हानात्मक, पण … ; हवाईदल प्रमुखांनी व्यक्त केला विश्वास

शत्रूला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यास सक्षम, हवाईदल प्रमुखांचं वक्तव्य

“सध्या आपल्या देशाला आणि हवाईदलाला सायबर आणि ड्रोनचा धोका यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या आव्हानांचा सामना करताना आपल्याला पुढं जावं लागेल आणि आव्हानांचा सामना करतच जगातील सर्वोत्कृष्ट हवाई दल बनलं पाहिजे,” असं मत हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी व्यक्त केलं. ८८ व्या हवाईदल दिनानिमित्त गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. आपल्या संस्कृतीत शांततेला महत्त्व आहे आणि शांतता कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असंही ते म्हणाले.

यावेळी एलएसीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाईदल प्रमुखांनी चीनला कठोर शब्दात संदेश दिला. “करोना काळात भारतानं शेजारी राष्ट्रांना शक्य ती सर्व मत केली. हवाईदलानं आपल्या विमानांच्या मदतीनं अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षितरित्या पोहोचवलं. याव्यतिरिक्त शेजारी राष्ट्रांना आपात्कालिन साहित्य आणि अन्य मदतही केली. परंतु यासोबतच हवाईदल शत्रूंना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासही सक्षम आहे. नुकत्याच हवाई दलात सामील झालेल्या राफेल लढाऊ विमानं, तसंच चिनूक आणि आपाचे हेलिकॉप्टर्सनं हवाई दलाची ताकद वाढवली आहे,” असंही भदौरिया म्हणाले. करोना काळात मोलाची कामगिरी बजावणार्या योद्धांचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं.

येणारं दशक आव्हानात्मक

येणारं दशक आव्हानात्मक आहे. आम्हाला सायबर हल्ला, ड्रोनद्वारे पाळत ठेवणं यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. परंतु नेहमीप्रमाणएच हवाईदल प्रत्येक आव्हानासाठी स्वतःला तयार करत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र, रोहिणी रडार, तेजस विमान आणि आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा भारतीय तंत्रज्ञानानं तयार केली गेली आहे. तसंच भारतीय तंत्रज्ञानाने विकसित केलेली विमानं आणि क्षेपणास्त्र यंत्रणा आगामी काळात हवाई दलाचा भाग बनतील. नेटवर्क सपोर्ट विमानं ही आता भारतीय हवाई दलाचा भाग आहेत आणि यामुळे हवाई दलाची ताकद वाढली आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतीय हवाईदल पूर्णपणे पेपरलेस बनविण्याचे लक्ष्य आहे. तीन सैन्याच्या समन्वयासाठी संरक्षण संरक्षण प्रमुखांची नेमणूकही उत्तम असल्याचे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 11:39 am

Web Title: we are entering an era which will redefine where we employ aerospace power conduct integrated multi domain operations iaf chief jud 87
Next Stories
1 सीबीआय चौकशीची मागणी करत तेजस्वी यादवांकडून नितीश कुमारांची कोंडी
2 देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६८ लाखांच्या पार; २४ तासांत ७८,५२४ नवे रुग्ण
3 Bihar Election : शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर
Just Now!
X