News Flash

“आम्ही जिंकणार,” बायडेन यांनी व्यक्त केला विश्वास; व्हाईट हाऊसमध्ये तयारी सुरु

"आम्ही स्पष्ट आणि खात्रीशीरपणे जिंकत आहोत"

(Photo: AP)

डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांनी मतांमध्ये आपण आघाडी घेत असल्याने विजय नक्की असल्याचं म्हटलं होतं. मात्र अद्यापही प्रसारमाध्यमांनी जो बायडेन यांना अधिकृतपणे विजयी घोषित केलेलं नाही. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, बायडेन यांनी पुन्हा एकदा विजयाची खात्री व्यक्त केली आहे. तसंच कमला हॅरिस काही तज्ञांच्या भेटी घेत असून व्हाईट हाऊसमधील तयारीला सुरुवात झाली असल्याचंही ते म्हणाले आहेत.

“आकडे सांगत आहेत की, आम्ही स्पष्ट आणि खात्रीशीरपणे जिंकत आहोत. आम्ही ही स्पर्धा जिंकणार आहोत,” असं बायडेन यांनी सांगितलं आहे. तसंच उपाध्यपदाची निवडणूक लढणाऱ्या कमला हॅरिस काही तज्ञांची भेट घेत आहेत. व्हाईट हाऊसमधील तयारीचा ते आढावा घेतील अशी माहिती बायडेन यांनी दिली आहे.

आणखी वाचा- US Election 2020: …तर व्हाइट हाऊसमधून एस्कॉर्ट केलं जाईल, जो बायडेन यांचा ट्रम्प यांना इशारा

बायडेन यांनी विजयी भाषणाची तयारी केली होती. पण टेलिव्हिजन नेटवर्क आणि इतरांच्या अनुपस्थितीमुळे त्यांनी निर्णय रद्द केला. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. महत्त्वाच्या पेनसिल्वेनिया, जॉर्जिया, अॅरिझोना आणि नेवाडा येथील मतं भवितव्य ठरवणार असून बायडेन यांनी आघाडी घेतली आहे.

अमेरिकेतील जनतेने आपल्याला करोनाशी लढा देण्यासाठी तसंच ढासळती अर्थव्यवस्था सावरण्यासाठी, वातावरण बदल अशा अनेक गोष्टींसाठी निवडून दिल्याचं बायडेन यांनी सांगितलं आहे. देशाला एकत्र यायचं असून दुभागलं जाण्याची इच्छा नाही हे दाखवून दिलं आहे असंही ते म्हणाले आहेत. शनिवारी आपण पुन्हा एकदा जनतेला संबोधित करु अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा- US Election 2020 : पहिल्याच दिवशी करोनावर देणार अ‍ॅक्शन प्लॅन; आरोपांदरम्यान बायडेन यांची कामाला सुरूवात

ट्रम्प यांना इशारा
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प परभवाच्या छायेत असतानाही तो मान्य करण्यास तयार नाहीत. डोनाल्ड ट्रम्प वारंवार मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप करत असून कोर्टातही धाव घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत जो बायडेन यांना चुकीच्या पद्धतीने राष्ट्राध्यक्ष पदावर दावा करु नये अशा इशारा दिला आहे. दरम्यान जो बायडेन यांच्या प्रचार टीमने ट्रम्प यांनी पराभव स्वीकारण्यास नकार दिला तर व्हाइट हाऊसमधून एस्कॉर्ट केलं जाईल असं सांगितलं आहे. एएफपीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

“ज्याप्रमाणे आम्ही १९ जुलैला म्हटलं होतं की, अमेरिकेची जनता निवडणुकीचं भवितव्य ठरवेल. आणि अमेरिकन सरकार ट्रेसपास करणाऱ्यांना योग्य प्रकारे एस्कॉर्ट करण्यात समर्थ आहे,” असं जो बायडेन यांच्या प्रचारमोहीमेचे प्रवक्ते अॅण्ड्रू बेट्स यांनी म्हटलं आहे. जुलै महिन्यात Fox News ला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी निकाल मान्य करण्यास तसंच पराभव झाल्यास सत्ता दुसऱ्याके सोपवण्यास नकार दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 12:39 pm

Web Title: we are ging to win this race says joe biden donald trump white house sgy 87
Next Stories
1 …तर त्यांना सन्मानाने निरोप दिला पाहिजे – संजय राऊत
2 हवं असल्यास फारूख अब्दुल्लांनी पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावं : संजय राऊत
3 US Election 2020 : पहिल्याच दिवशी करोनावर देणार अ‍ॅक्शन प्लॅन; आरोपांदरम्यान बायडेन यांची कामाला सुरूवात
Just Now!
X