राजनाथसिंह यांचे पाक शिष्टमंडळाला सुनावले

सर्व शेजारी देशांशी भारताला मैत्रीचेच संबंध असावेत असे वाटते. त्यामुळे आम्ही सीमेवर एकही गोळी झाडणार नाही, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. पाकिस्तानचे शिष्टमंडळ भारतात आले असून सीमेवरील तणावपूर्ण परिस्थिती निवळण्यासाठी सुरक्षा दलांच्या महासंचालक पातळीवर ही चर्चा होत आहे. पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम भारतात वास्तव्य करीत असल्याने भारत हा पाकिस्तानपेक्षा जास्त इस्लामी असल्याचेही ते म्हणाले.
पाकिस्तानी रेंजर्सचे महासंचालक मेजर जनरल उमर फारुक बुर्की यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला राजनाथ सिंह यांनी सांगितले की, शेजारी देशांशी भारताला मित्रत्वाचे संबंध हवे आहेत. आम्ही सीमेवर एक गोळीही पाकिस्तानच्या दिशेने झाडणार नाही. बुर्की यांनी सिंह यांना सांगितले की, आपण केवळ महासंचालक आहोत नेते नाही, त्यामुळे याबाबत कुठले आश्वासन देऊ शकत नाही. तुमचा संदेश आपण पाकिस्तानी नेत्यांना देऊ असे त्यांनी स्पष्ट केले.