27 February 2021

News Flash

“कुठल्याही स्थितीचा सामना करायला आम्ही सज्ज, देशाच्या सन्मानाशी तडजोड नाही”

संरक्षण मंत्र्यांचा चीनला इशारा

आम्हाला शांतता हवीय, वाद नको. भारत कुठल्याही स्थितीचा सामना करण्यास सज्ज आहे, मोदी सरकार देशाच्या सन्मानाशी तडजोड करणार नाही, अशा शब्दांत संरक्षमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला इशारा दिला आहे. त्याचबरोबर सीमापार दहशतवाद आणि भारताविरूद्धच्या छुप्या युद्धाला चालना देण्याऱ्या पाकिस्तानवरही राजनाथ यांनी टीका केली.

हैदराबादमधील दुंडिगल येथील एअरफोर्स अॅकेडमीतील पदवीदान समारंभात राजनाथ सिंह बोलत होते. “पश्चिमेकडून आपला शेजारी देश पाकिस्तान सीमेवर दुष्टकृत्य करत आहे. भारतासोबत चार युद्ध हारल्यानंतरही दहशतवादा आडून पाकिस्तान भारतासोबत छुपं युद्ध छेडतच आहे. मात्र, हे हल्ले परतवून लावणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा मी सत्कार करु इच्छितो,” असं राजनाथ यावेळी म्हणाले.

आपल्या देशाचे तुम्ही रक्षणकर्ते आहात हे आमचं नशिब आहे. आपण आपल्या कर्तव्याला न्याय द्यालं, असा आम्हाला विश्वास आहे. बदलत्या काळासोबत देशाला असलेले धोके आणि युद्ध रनणीतीमध्येही आता बदल होत आहे, असं निरिक्षणंही यावेळी राजनाथ यांनी नोंदवलं.

भारत कोणत्याही स्थितीचा समना करण्यासाठी सज्ज असून एलओसीवर पाकिस्तान तर एलएसीवर चीन या दोन्ही देशांशी भारताचा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे भारताच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवरील आव्हानं देखील आपल्या स्त्रोतांसाठी आव्हान आहे. भाजपाचे सरकार सीमेवर स्त्रोतांची कुठलीही कमी पडू देणार नाही, याचा मी तुम्हाला खात्री देतो, असंही राजनात यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 2:28 pm

Web Title: we are ready to face any situation not compromise with the honor of the country defense minister warns china aau 85
Next Stories
1 काँग्रेस अध्यक्ष पदासाठी ९९.९ टक्के नेत्यांची ‘या’ नावाला पसंती
2 ASSOCHAM FW2020: भारतीय अर्थव्यवस्थेवर जगाचाही विश्वास -पंतप्रधान मोदी
3 धक्कादायक, मुलीनेच प्रियकराच्या मदतीने केली आई-वडिलांची हत्या
Just Now!
X