News Flash

परिस्थिती गंभीर आहे पण आम्ही यावर मात करू ; ‘पीएमसी’च्या प्रमुखांनी व्यक्त केला विश्वास

"बँकेचा व्यवस्थापकीय संचालक या नात्याने म्हणून मी जबाबदारी स्वीकारतो आणि सर्व ठेवीदारांना हमी देतो की...

(छायाचित्र - गणेश शिर्सेकर )

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यानुसार, पीएमसी बँकेवर नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील. याशिवाय निर्बंधाच्या काळात बँकेच्या ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ एक हजार रुपयेच काढता येणार आहेत. दरम्यान, अचानक आरबीआयकडून पीएमसी बँकेवर निर्बंध लादल्याचं समजल्यापासून बँकेच्या ठेवीदारांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. तर, यावर प्रतिक्रिया देताना “परिस्थिती गंभीर आहे पण आम्ही यावर मात करू” असा विश्वास पीएमसी बँकेचे प्रमुख जॉय थॉमस यांनी व्यक्त केला आहे.

“आरबीआयने पीएमसी बँकेवर, बँकिंग नियमन कायदा ’35 अ’ अंतर्गत कारवाई करत सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आहेत. व्यवहारातील अनियमितता उघड झाल्यामुळे हे निर्बंध लागू करण्यात आलेत. पण, बँकेचा व्यवस्थापकीय संचालक या नात्याने म्हणून मी जबाबदारी स्वीकारतो आणि सर्व ठेवीदारांना हमी देतो की सहा महिन्यांच्या मुदतीपूर्वीच अनियमितता सुधारल्या जातील”, असा विश्वास जॉय यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना त्यांनी, “अनियमितता दुरुस्त करून निर्बंध हटविण्याचे सर्वोतपरी प्रयत्न केले जातील. तुम्हा सर्वांसाठी ही कठीण वेळ आहे आणि माफी मागून तुमच्या अडचणी कमी होणार नाहीत याची मला कल्पना आहे. पण, कृपया तुम्ही आम्हाला सहकार्य करा, या कठीण परिस्थितीवर नक्कीच मात करु आणि खंबीरपणे पुन्हा उभे राहू असा विश्वास आहे”. अशी प्रतिक्रिया दिली.

निर्बंध कोणते –
-रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये
-जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये
-बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये
-नव्या ठेवी स्वीकारू नयेत,
-किंवा बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करू नयेत, अशाप्रकारचे निर्बंध बँकेवर असतील असं आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, आरबीआयने निर्बंध लादल्याचं समजल्यापासून पीएमसीच्या ठेवीदारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. पीएमसी बँकांच्या शाखांसमोर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 1:09 pm

Web Title: we assure that we will definitely overcome this situation says pmc md joy thomas after rbi directs financial restrictions sas 89
Next Stories
1 ‘पीएमसी’ बँकेवर ‘आरबीआय’चे निर्बंध, केवळ एक हजार रुपयेच काढता येणार
2 ग्राहकांना दिलासा; बँक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
3 पेट्रोल – डिझेल वाहनांवर बंदी नाही
Just Now!
X