पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासोबत पाकने वाईट व्यवहार केल्याचा दावा संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. यापूर्वी पाकिस्तानकडून अभिनंदन यांना चांगली वागणूक दिल्याचे काही व्हायरल फोटो आणि व्हिडिओंमधून सांगण्यात येत होते. अर्थात याची सत्यता समोर आली नव्हती.


संरक्षण दलाचे अधिकारी म्हणाले, पाकिस्तानद्वारे करण्यात आलेला हवाई हल्ला भारताच्या सैन्य तळांवर केलेला हल्ला होता. त्याचबरोबर पाकिस्तानी सैन्याने जिनिव्हा कराराचे उल्लंघन करताना भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन यांना वाईट वागणूक दिली आहे.

त्याचबरोबर पाकिस्तानी सैन्य जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेला पाठींबा देत आहे. तसेच मसूद अजहर सारख्या त्याच्या म्होरक्याला पाकिस्तानकडून आपल्या देशात आश्रय दिला जात आहे. असा आमचा ठाम विश्वास आहे, असेही संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.