News Flash

पतंजलीचं औषध घेतल्यानंतर करोनाचे रुग्ण ५ ते १४ दिवसात ठणठणीत झाले-आचार्य बालकृष्ण

पुढील पाच दिवसात औषधाचे पुरावे देणार

पतंजलीचं औषध घेतल्यानंतर करोनाचे रुग्ण ५ ते १४ दिवसात ठणठणीत झाले असा दावा आचार्य बालकृष्ण यांनी केला आहे. करोना या रोगाचा इलाज आर्युर्वेदिक औषधामुळे शक्य आहे. आमचं औषध घेणाऱ्या ७० टक्के लोकांचा करोना हा अवघ्या पाच दिवसांमध्ये बरा झाला. इतकंच नाही तर जे पेशंट करोना पॉझिटिव्ह झाले होते ते आमच्या औषधानंतर निगेटिव्ह झाले असाही दावा बालकृष्ण यांनी केला आहे.

आम्ही औषध शोधल्याचा दावा करतो आहोत तर आमच्याकडे पुरावे मागितले जाणार हे उघड आहे. आम्ही पुढच्या पाच दिवसांमध्ये याबाबतचे सगळे पुरावे देत आहोत असंही बालकृष्णा यांनी सांगितलं. तसंच आम्ही क्लिनिकल ट्रायल्सही करतो आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 5:46 pm

Web Title: we conducted clinical case study on many positive patientsweve got 100 percent favorable results says acharya balkrishna scj 81
Next Stories
1 “नोटबंदीच्या संकटाचा विक्रम लॉकडाउननं मोडला; देशाला उपचार हवेत, प्रचार नको”
2 योगी आदित्यनाथ मजुरांच्या खात्यात पाठवणार १०४ कोटी रुपये, १० लाख ४८ हजार जणांना मिळणार फायदा
3 भारतात समूह संसर्ग, लोकांनी काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारनं सत्य स्वीकारावं; तज्ज्ञांची सूचना
Just Now!
X