05 August 2020

News Flash

अशा तमाशाची गरज नाही; खर्गेंची संरक्षणमंत्र्यांच्या राफेल पूजनावर टीका

"अशा प्रकारच्या तमाशाची गरज नाही. जेव्हा आम्ही बोफोर्स तोफ भारतात आणली होती तेव्हा अशा प्रकारचा दिखावा केला नव्हता"

दसऱ्याच्यादिवशी फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानांचे पूजन करण्यावरुन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याबाबत सोशल मीडियातून उलट-सुलट चर्चा सुरु होती. विरोधकांनी देखील त्यांच्या या कृतीवर टीका केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी राजनाथ यांच्या शस्त्र पूजनाला ‘तमाशा’ असे संबोधले आहे.

फ्रान्सकडून भारताला मिळणाऱ्या ३६ राफेल लढाऊ विमानांपैकी पहिले विमान भारतात आणण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दसऱ्याच्या दिवशी पॅऱिसला गेले होते. तिथे त्यांनी हिंदू संस्कृतीप्रमाणे या विमानातीच विधीवत पुजा केली. विमानावर ओम चिन्ह काढत त्यावर फुलं अर्पण केली तसेच या विमानाला कोणाची नजर लागू नये म्हणून विमानाच्या चाकांखाली नारळ आणि लिंबू ठेवत पूजन केले होते. यावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अशा प्रकारच्या तमाशाची गरज नाही. जेव्हा आम्ही बोफोर्स तोफ भारतात आणली होती तेव्हा अशा प्रकारचा दिखावा केला नव्हता, असे त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. तसेच राफेल विमानांच्या क्षमतांबाबत बोलताना ते म्हणाले, भारतीय हवाई दलाचे अधिकारी या विमानांचा वापर केल्यानंतर ठरवतील की ही विमाने चांगली आहेत की वाईट.

‘मेड इन फ्रान्स’ असलेल्या ३६ राफेल विमानांपैकी पहिले विमान ज्याचा टेल नंबर RB-001 असा आहे ते मंगळवारी फ्रान्स सरकारकडून भारताच्या ताब्यात देण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या वर्धापन दिनादिवशीच आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर ते भारताला मिळाले. २३ सप्टेंबर २०१६ रोजी ३६ राफेल विमाने भारताला देण्याबाबत भारत सरकार आणि फ्रान्स सरकारमध्ये करार झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2019 4:47 pm

Web Title: we did not pretend to be bofors kharge criticizes defense minister on rafael pujan aau 85
Next Stories
1 राफेलला धर्माशी का जोडलं? काँग्रेसचा शस्त्रपूजेवर सवाल
2 टेरर फंडिंगसाठी पाकिस्तानद्वारे भारतीय बनावट नोटांचा वापर!
3 AIR FORCE ONE: मोदींचं खास विमान, मिसाइल हल्लाही होणार निष्प्रभ
Just Now!
X