News Flash

UNSCच्या बैठकीत युकेचा पाकिस्तानला पाठिंबा नव्हता; ब्रिटनच्या परराष्ट्र खात्याचा खुलासा

काश्मीर मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेची (UNSC) शुक्रवारी बंद दरवाजा आड गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत युकेने चीनला पाठिंबा दिल्याची चर्चा भारतीय माध्यमांमध्ये

संग्रहीत छायाचित्र

काश्मीर मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेची (UNSC) शुक्रवारी बंद दरवाजा आड गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत युकेने चीनला पाठिंबा दिल्याची चर्चा भारतीय माध्यमांमध्ये होती. मात्र, या चर्चेत तथ्य नसून आम्ही पाकिस्तान आणि चीनला पाठींबा दिला नव्हता, असा खुलासा ब्रिटनच्या परराष्ट्र खात्यांच्या सुत्रांनी केला आहे.

या सुत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले की, “निश्चितपणे आम्ही या चर्चेत कोणाचीही बाजू घेतली नव्हती तसेच भारताविरोधात चीनच्या भुमिकेलाही आम्ही पाठींबा दर्शवलेला नाही. भारत आणि पाकिस्तान यांनी परस्पर चर्चेतून काश्मीरप्रश्नावर चिरस्थायी राजकीय तोडगा काढावा, अशीच आमची नेहमी भुमिका राहिली आहे. चीनने या बैठकीची मागणी केली होती त्यात आमचा कोणताही सहभाग नव्हता. कलम ३७० रद्द करण्याबाबत भारताने एकतर्फी निर्णय घेतल्याचे चीनला या बैठकीत म्हणायचे होते, असे स्पष्टीकरणही या सुत्रांनी दिले आहे.

बंद दरवाजा आड झालेल्या या बैठकीनंतर याची माहिती देणारे कोणतेही स्टेटमेंट देण्यात आले नव्हते तसेच यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. ६० वर्षात पहिल्यांदाच काश्मीर मुद्द्यावर युएनएससीत चर्चा झाली होती. काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवला जावा अशी कायमच युकेची भुमिका राहिली आहे, असे ब्रिटनच्या परराष्ट्र खात्यांच्या सुत्राने म्हटले आहे.

युएनएससीच्या बैठकीनंतर अनेक भारतीय पत्रकारांनी म्हटले होते की, या बैठकीतील चर्चेची माहिती सार्वजनिक स्टेटमेंटद्वारे देण्यात यावी आशी मागणी दोन देशांनी केली होती. यासाठी चीनने या स्टेटमेंटचा मसुदा तयार केला होता, यासाठी चीनचा युकेला पाठींबा होता. या बैठकीत भारताला फ्रान्स आणि अमेरिकेकडूनच मोठा पाठींबा मिळाल्याचेही त्यांनी म्हटले होते. दरम्यान, युकेच्या परराष्ट्र कार्यालयाने या बैठकीवर भाष्य करण्यास नकार दिला होता कारण ही बैठक खासगी स्वरुपात झाली होती, असेही युकेच्या परराष्ट्र विभागाच्या सुत्रांनी स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 11:52 am

Web Title: we did not support pakistan at the unsc meeting disclosure of british diplomatic sources aau 85
Next Stories
1 झाकिर नाईकला मलेशियात भाषण बंदी
2 ‘भारतीय सेना पाकिस्तानला युद्धात सहज हरवेल’; इम्रान खान यांना घरचा आहेर
3 मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाच्याला अटक
Just Now!
X