पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारकडून काहीही चांगलं घडेल अशी अपेक्षाच जनतेला उरलेली नाही असे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. येत्या साठ दिवसात हे सरकार आणखी काही चांगले काही करु शकेल असेही वाटत नाही. देशाची अर्थव्यवस्था मोदी सरकारमुळे धोक्यात आली आहे अशीही टीका पी चिदंबरम यांनी केली. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली आहे.

तीन दिवसांपूर्वीच पी चिदंबरम यांनी मोदी सरकारला पराभवाची चाहूल लागल्याचे म्हटले आहे. भाजपा सरकार आता पैसे खर्च करण्याच्या मागे लागले आहे. मात्र त्यांच्या या धोरणाला आता जनता भुलणार नाही अशी टीका चिदंबरम यांनी केली होती. आज त्यांनी अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच नोटाबंदीच्या मुद्द्यावरूनही मोदी सरकारवर टीका केली.