08 March 2021

News Flash

देशाच्या आत्मसन्मानासाठी जे करायला हवं ते आपण केलं : कमल हसन

संरक्षण कवचाला साजेशी कामगिरी आपल्या जवानांनी केली आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचा विशेष अभिमान वाटतो, आपल्या जवानांना सलाम.

कमल हासन

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकवर ज्य़ेष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, एखाद्या आत्मसन्मान असलेल्या देशाने जे करायला हवे ते आपण केले आहे.


हसन म्हणाले, आपल्या सैन्याने आपल्यासाठी जे काही केले त्याचा आम्हाला अभिमान आहे. हे जवान आपले संरक्षण कवच आहेत आणि त्यांनी संरक्षण कवचाला साजेशी कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचा विशेष अभिमान वाटतो, आपल्या जवानांना सलाम.

मंगळवारी भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील खैबर पख्तूनच्या बालाकोट भागात जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ले करीत मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांना कंठस्नान घातले यामध्ये जैशच्या टॉप कमांडर्सचा समावेश आहे.

जंगल आणि पर्वतीय भाग असणाऱ्या या भागात भारतीय हवाई दलाच्या मिराज २००० या लढाऊ विमानांच्या हल्यात जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा मेहुणा उस्ताद गौरी याचा खात्मा करण्यात आला असल्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 5:05 pm

Web Title: we have done what any self respecting nation would do says kamal haasan
Next Stories
1 Surgical Strike 2: जणू काही ज्वालामुखीच फुटला असं वाटलं, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अनुभव
2 Surgical strike 2: एअर स्ट्राइकमध्ये मसूद अझहरचे नातेवाईक टार्गेट
3 पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घेतला पाहिजे – रामदास आठवले
Just Now!
X