24 February 2021

News Flash

शाहरुख खानवर शाई फेकण्याचा कार्यक्रम रद्द; धमकी देणाऱ्या कलिंग सेनेची माघार

हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी ई-मेलद्वारे आम्हाला आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केल्याने हा निर्णय घेतला.

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याच्या तोंडाला शाई फासण्याची धमकी कलिंग सेनेने मागे घेतली आहे. सोमवारी झालेल्या कलिंग सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


याबाबत बोलताना कलिंग सेनेचे प्रमुख हेमंत रथ म्हणाले, पुरुषांच्या हॉकी वर्ल्डकपसारखी आंतरराष्ट्रीय स्पर्धा ओडिशामध्ये होत आहे. त्यामुळे राज्य आणि देशाची प्रतिमा लक्षात घेता आम्ही शाई फासण्याचा हा निर्णय मागे घेतला आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी ई-मेलद्वारे आम्हाला आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आम्ही राज्याच्या हितासाठी ही माघार घेतली आहे.

शाहरुख खानने १७ वर्षांपूर्वी केलेल्या ‘अशोका’ सिनेमामध्ये ओडिशाच्या लोकांचा अपमान केला असून त्यासाठी त्यांनी माफीही मागितली नव्हती, असा आरोप कलिंग सेनेने केला आहे. त्यासाठी १ नोव्हेंबर रोजी कलिंग सेनेने पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. २००१मध्ये अशोका सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याला ओडिशामध्ये मोठा विरोध झाला होता. एका आठवड्यातच हा सिनेमा चित्रपटगृहातून हटवण्यात आला होता.

दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शाहरुखला ओडिशात होणाऱ्या हॉकी वर्ल्डकपसाठी निमंत्रण दिले आहे. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडिअममध्ये २८ नोव्हेंबरपासून १६ डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.

यापार्श्वभूमीवर कलिंग सेनेने शाहरुख खानला जाहीररित्या धमकी दिली होती. जर शाहरुख खानने ओडिशामध्ये पाऊल ठेवले तर त्याच्यासोबत काय होईल याची कल्पना त्यानीही केली नसेल. ओडिशात आल्यास त्यांना काळे झेंडे दाखवले जातील तसेच त्यांच्या तोंडाला शाई देखील फासली जाईल, अशी धमकीही कलिंग सेनेने दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 12:13 pm

Web Title: we have withdrawn our threat to throw ink at shah rukh khan says kalinga sena chief hemant rath
Next Stories
1 मोदी सरकारचा RBIवर दबाव, दोन लाख कोटी रूपये सरकारला मिळणार?
2 साक्षी महाराजांना बॉम्बने उडवण्याची धमकी, मागितली ‘झेड प्लस’ सुरक्षा
3 आतापर्यंत मोदी सरकारने काय काम केले? भाजपा काढतेय पुस्तक
Just Now!
X