काश्मीरमध्ये पुन्हा एकदा झालेले्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याने सर्वच भारतीय हादरले आहेत. काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्याला लक्ष्य केले असून आयईडी स्फोटात २० जवान शहीद तर अनेक जवान जखमी झाले आहेत. उरी हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असून हल्ल्यानंतर सोशल मीडियावर नेटीझन्सनी नाराजी व्यक्त करत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज असल्याचे एकाने म्हटले आहे.

सर्व जवानासोबत भारतीय खंबीरपणे उभे आहेत. उरीप्रमाणे पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज आहे. यावेळी त्यांना घुसून मारण्याची गरज आहे. दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावे लागणार असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.

(आणखी वाचा : Pulwama Terrorist Attack: काश्मीरमध्ये CRPF च्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, १८ जवान शहीद) 

उरी हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात कडक कारवाई सुरू केली. उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांची ठिकाणे उद्धवस्थ केली होती. २०१६ मध्ये झालेला उरी आणि आताचा जम्मू काश्मीरमध्ये झालेला हल्ला जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केला होता. आज पुन्हा एकदा सोशल मीडियावर सर्जिकल स्ट्रईकची गरज असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.

(#Pulwama Terror Attack: उरीनंतरचा हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला)

काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांविरोधात भारतील लष्कराकडून गेल्या काही वर्षापासून व्यापक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भारतामध्ये दहशतवादी हल्ला केला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले आहेत. उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्करावर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. उरी हल्ल्यात १९ जवान शहीद झाले होते. सप्टेंबर २०१६ मध्ये काश्मीरमधल्या उरी येथील मुख्यालयावर पहाटेच्या सुमारास चार दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. आज झालेलेल्या हल्ल्यामध्ये शहीदांचा आकडा २० ला गेला आहे.

(Pulwama Terrorist Attack : मोदी ५६ इंची छाती फुगवून दहशतवादी हल्ल्याला उत्तर देणार का?-काँग्रेस) 

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया –