News Flash

आपण करोनासोबत जगण्याचं ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ शिकलं पाहिजे-गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य

संग्रहित

आपण करोनासोबत जगण्याचं ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ शिकलं पाहिजे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाने पाळाव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे. बाहेर वावरताना मास्क लावलाच पाहिजे. एक मीटरचं अंतर ठेवलं पाहिजे. तसंच सॅनेटायझरचा वापर हा ऑफिसमध्ये किंवा घरात प्रवेश करण्याआधी आणि बाहेर पडताना केला पाहिजे असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मॉल्स, सलोन्स, ब्युटी पार्लर्स कधी सुरु होतील हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना हे लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी या ठिकाणी कोणतीही गर्दी न करता विशिष्ट अंतर पाळणं आवश्यक आहे असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर राज्य सरकार या संदर्भात जे निर्देश आणि नियम आखून देईल त्याचं पालन करणंही महत्त्वाचं आहे असंही गडकरींनी स्पष्ट केलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 8:04 pm

Web Title: we need to learn art of living with corona says union minister nitin gadkari scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 बांधकाम उद्योगाला मिळणार मोठा दिलासा
2 मध्य प्रदेशात जैन साधूंच्या स्वागतासाठी रस्त्यावर लोकांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन
3 पायी चालणाऱ्या मजुरांची अर्थमंत्र्यांकडून क्रूर थट्टा-पी. चिदंबरम
Just Now!
X