News Flash

VIDEO: तुम्हाला कसे मारतो ते संपूर्ण जगाला दाखवणार, भारताचा पाकिस्तानला इशारा

भारताने ही कारवाई करुन काश्मीरच्या केरान सेक्टरमध्ये शहीद झालेल्या पाच पॅरा कमांडोंच्या मृत्यूचा बदला घेतला.

भारतीय सैन्याने शुक्रवारी थेट पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या लाँच पॅडसवर हल्ला चढवला. सैन्याने अत्यंत अचकू प्रहार केला, त्यामध्ये हे लाँच पॅड उद्धवस्त झाले. भारताने ही कारवाई करुन काश्मीरच्या केरान सेक्टरमध्ये शहीद झालेल्या पाच कमांडोंच्या मृत्यूचा बदला घेतला. भारताने या हल्ल्यासाठी बोफोर्स तोफाचा वापर केला.

भारताने या कारवाईतून नापाक कारस्थाने रचणाऱ्या पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. भारताने ड्रोन विमानाच्या मदतीने या हल्ल्याचा व्हिडीओ शूट केला. आम्ही फक्त तुम्हाला मारणारच नाही, तर कसे मारतो ते संपूर्ण जगाला दाखवणार हा स्पष्ट संदेश भारताने या कारवाईतून दिला आहे.

सध्या संपूर्ण जग करोनाच्या संकटाचा सामना करत आहे. भारताप्रमाणे पाकिस्तानही करोनामुळे चिंतेत आहे. पण या परिस्थितीतही पाकिस्तानने आपल्या नापाक कारवाया बंद केलेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी उत्तर काश्मीरच्या केरान सेक्टरमध्ये काही दहशतवादी घुसले होते. पाकिस्तानातून त्यांनी घुसखोरी केली होती.

भारताच्या स्पेशल फोर्सेसच्या जवानांनी प्राणाची बाजी लावून त्यांच्याशी मुकाबला केला व पाच दहशतवाद्यांना तिथेच संपवले. या मध्ये स्पेशल फोर्सेसचे पाच जवान शहीद झाले. ही लढाई इतकी भीषण होती की, कमांडो आणि दहशतवा्दयांमध्ये समोरासमोर लढाई झाली. भारताने शुक्रवारी थेट लाँच पॅड उडवून पाकिस्तानच्या घुसखोरीचा बदला घेतला. याच लाँच पॅडवरुन भारतात दहशतवादी पाठवले जात होते. भारतीय सैन्याने हल्ल्यासाठी १५५ एमएम बोफोर्स तोफांचा वापर केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 11:57 am

Web Title: we not only kill you we will show world how we hit you india warns pakistan dmp 82
Next Stories
1 अमेरिकेत मृत्यूतांडाव! जगातील कोणत्याच देशात एका दिवसात झाले नाही एवढे मृत्यू
2 डॉक्टरांसारखा पोशाख करुन ते दोघे अंमली पदार्थांच्या शोधात घराबाहेर पडले आणि…
3 “माहिती लपवली तर हत्येचा गुन्हा दाखल करणार”, तबलिगीच्या सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
Just Now!
X