दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला इराणने चांगलेच खडसावले आहे. दहशतवाद्यांना पोसण्याची मोठ्ठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा इराणने दिला आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिणीचा दिलेल्या मुलाखतीत रिवोल्यूशनरी गार्ड्सचे कमांडर मेजर जनरल मोहम्मद अली जाफरी यांनी हे वक्तव्य केले आहे. सैनिकांच्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यातील षडयंत्रात असणाऱ्यांना समर्थन देत असल्याचा पाकिस्तानवर इराण रिवाल्यूशनरी गार्ड्सने आरोप केला आहे.

बुधवारी इराणमध्ये रिवोल्यूशनरी गार्ड्सवर झालेल्या दहशतावदी हल्ल्यात २७ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला दहशतवादी संघटना जैश-अल-अद्लने केल्याचे जाफरी म्हणाले. जैश-अल-अद्लकडे इशारा करत जाफरी यांनी पाकिस्तानवर निशाना साधला आहे. जाफरी म्हणाले की, ‘दहशतवादी आणि मुस्लीम धर्माला धोकादायक असलेले कुठे आहेत हे पाकिस्तान सराकारला माहित आहे. पाकिस्तानच्या सैनिकांचे या दहशतवाद्यांना समर्थन आहे.’

जर पाकस्तान सरकारने दहशतवाद्यावर कारवाई करत दंड दिला नाही तर आम्ही या दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देऊ आणि पाकिस्तानला दहशतवादी पोसण्याची किंमत चुकवावी लागेल, असे मोहम्मद अली जाफरी यांनी पाकिस्तान खडसावले आहे.