22 January 2021

News Flash

हो, करोनाला रोखणारी लस बनवण्याची टेक्निक इस्रायल भारताला देणार

'करोनाला रोखणारी लस शोधण्याच्या निर्णायक टप्प्यावर आम्ही पोहोचलो आहोत'

संग्रहित छायाचित्र

“करोना व्हायरसविरोधात लस बनवण्याच्या निर्णायक टप्प्यावर आम्ही पोहोचलो असून आता फक्त क्लिनिक चाचण्य़ांमधून काय समोर येते त्याची प्रतिक्षा आहे” असे इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन मल्का बुधवारी म्हणाले. ‘करोनाला रोखणारी लस शोधण्याच्या निर्णायक टप्प्यावर आम्ही पोहोचलो आहोत. निश्चित आम्ही ही सर्व माहिती जगासोबत शेअर करु’ असे रॉन मल्का यांनी सांगितले. याचाच अर्थ भारतालाही लस निर्मितीची सर्व माहिती मिळणार आहे.  टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चने करोना व्हायरस अ‍ॅंटीबॉडी किंवा पॅसिव्ह लस विकसित करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सुरु झाल्या आहेत का? तसेच याची लस विकसित करण्यासंबंधीची माहिती इतरांना देणारा का? या प्रश्नावर रॉन मल्का बोलत होते.

“करोना व्हायरसमुळे भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश अधिक जवळ आले असून Covid-19 चा कसा सामना करायचा? याबद्दलचे अनुभव परस्परांना शेअर करत असतात” असे मल्का यांनी सांगितले.

इस्रायला नेमका लस निर्मितीच्या कुठल्या टप्प्यावर पोहोचलाय?
इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चने करोना व्हायरस अ‍ॅंटीबॉडी किंवा पॅसिव्ह लस विकसित करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. अँटीबॉडी व्हायरसवर हल्ला करुन व्हायरसला शरीरामध्येच संपवून टाकतात अशी माहिती संशोधकांच्या टीमने इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांना दिली. ‘बायोलॉजिकल इन्स्टिट्यूट स्टाफने महत्वपूर्ण यश मिळवले असून त्यांचा आम्हाला अभिमान आहे’ असे संरक्षण मंत्री नाफताली बेन्नेट म्हणाले. ‘ज्युंची कल्पकता आणि हुशारीमुळे हे साध्य झाले’ असे बेन्नेट म्हणाले.

अ‍ॅंटीबॉडी आधारीत लसीच्या उंदरावर चाचण्या सुरु केल्याची माहिती मागच्या महिन्यात IIBR ने दिली होती. ही इन्स्टिट्यूट करोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांचे प्लाझ्मांचे सुद्धा कलेक्शन करत आहे.

मिगव्हॅक्स ही इस्रायलमधली संशोधकांची दुसरी टीम सुद्धा करोना व्हायरसविरोधात लस बनवण्याचा पहिला टप्पा पूर्ण करण्याच्याजवळ पोहोचली आहे. इस्रायलने आतापर्यंत चार लाख ४ हजार नागरिकांच्या करोना चाचण्या केल्या आहेत. त्यात १६,२४६ नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. करोनामुळे इस्रायलमध्ये आतापर्यंत २३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 3:21 pm

Web Title: we will share it with the world israels ambassador to india dmp 82
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोना व्हायरस पर्ल हार्बर आणि ९/११ हल्ल्यापेक्षाही भयंकर – डोनाल्ड ट्रम्प
2 आम्ही घरपोच दारु पुरवतो, परवानगी द्या; ‘या’ प्रसिद्ध कंपनीचा प्रस्ताव
3 VIDEO: नौदलाचं ऑपरेशन ‘समुद्र सेतू’, INS जलाश्व मालदीवमध्ये दाखल
Just Now!
X