04 August 2020

News Flash

लव्ह जिहाद रोखायचंय… कपाळी कुंकू लावा, धार्मिक वातावरण निर्माण करा: विहिंप

दुर्गा वाहिनी आणि बजरंग दल या विश्व हिंदू परिषदेशी संलग्न संघटनांनी पश्चिम बंगालमध्ये लव्ह जिहादविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

कपाळी कुंकू लावा आणि गळ्यात मंगळसूत्र घाला, घरात हिंदू सण साजरे करा, धार्मिक वातावरण निर्माण करा, आंतरधर्मीय विवाह केल्यास पतीला हिंदू धर्म स्वीकारायला लावा, मदतीसाठी आमच्याशी संपर्क साधा….विश्व हिंदू परिषदेने पश्चिम बंगालमध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधात सुरु केलेल्या मोहिमेतील पत्रकामधील या काही सूचना.. या पत्रकांचे आता घरोघरी वाटप केले जाणार आहे.

दुर्गा वाहिनी आणि बजरंग दल या विश्व हिंदू परिषदेशी संलग्न संघटनांनी पश्चिम बंगालमध्ये लव्ह जिहादविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. लव्ह जिहादविरोधात घरोघरी जाऊन जनजागृती मोहीम राबवली जाईल, अशी माहिती पश्चिम बंगाल, बिहार आणि ओदिशा येथील विश्व हिंदू परिषदेचे सचिव सच्चिंद्रनाथ सिन्हा यांनी दिली. ‘पश्चिम बंगालमध्ये ‘लव्ह जिहाद’चे भीषण वास्तव जनतेसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. लव्ह जिहाद रोखण्यासाठी आम्ही पालकांना काही सूचना दिल्या आहेत. या सूचनांची पत्रके तयार करुन ती घरोघरी वाटली जातील, असे त्यांनी सांगितले.

तसेच ज्या पालकांच्या मुली लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकल्या त्या पालकांचे समुपदेशन करुन त्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करुन दिली जाईल, असेही सिन्हा यांनी म्हटले आहे. ‘लव्ह जिहाद’चा प्रकार कसा ओळखावा, त्यापासून मुलींचे रक्षण कसे करावे, मुलगी त्या जाळ्यात अडकली तर काय करावे, याची माहितीही या पत्रकांमध्ये देण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमधील विहिंपचे प्रवक्ते सौरीश मुखर्जी म्हणाले, आमचा प्रेमविवाहाला विरोध नाही. आमचा विरोध हिंदू मुलींना लक्ष्य करण्यासाठी सुरु केलेल्या लव्ह जिहादला आहे. आम्ही लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलींच्या पालकांची एक यादी तयार केली आहे. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. मुलीच्या घरवापसीसाठी आम्ही त्यांना मदत करु, असे त्यांनी सांगितले. दुर्गा वाहिनीचे ३५ हजार आणि बजरंग दलाचे ४० हजार सदस्य या मोहीमेत सहभागी होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2018 9:35 am

Web Title: wear sindoor create religious atmosphere vhp campaign in west bengal against love jihad
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 Google Doodle : शिक्षक दिनानिमित्त गुगलचे स्पेशल डुडल
3 इराणकडून तेल, रशियाकडून शस्त्रे खरेदीला भारत-अमेरिका चर्चेत महत्त्व
Just Now!
X