News Flash

केजरीवालांच्या निर्णयाचे स्वागत; आश्वासने ‘आप’ पूर्ण करेल अशी आशा- शीला दीक्षित

दिल्लीत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी घेतल्याने मी त्यांचे स्वागत करते, असे माजी मुख्यमंत्री शीला

| December 23, 2013 02:41 am

दिल्लीत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी घेतल्याने मी त्यांचे स्वागत करते, असे माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी म्हटले आहे. तसेच केजरीवाल यांनी निवडणुकीदरम्यान दिल्लीकरांनी दिलेली आश्वासने पूर्ण करतील अशी आशा बाळगते असेही त्या म्हणाल्या.
दिल्लीत ‘आम आदमी’चे सरकार, रामलीला मैदानावर शपथविधी
“आम्ही या आधीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी आपला बाहेरून पाठिंबा देण्याचे आम्ही याआधीच सांगितले होते. केजरीवालांनी आज सत्ता स्थापन करण्याची तयारी दर्शविली याचे मी अभिनंदन करते आणि निवडणुकीदरम्यान दिल्लीकरांनी त्यांनी दिलेली आश्वासने ते पूर्ण करतील अशी आशा बाळगते.” असे शीला दीक्षित म्हणाल्या.
अरविंद केजरीवाल हेच मुख्यमंत्री बनतील, असे सकाळीच पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांनी स्पष्ट केले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला २८ जागा मिळाल्या होत्या. आम आदमीने घालून दिलेल्या १६ अटी मान्य करीत कॉंग्रेसने त्यांना बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 2:41 am

Web Title: welcoming aaps decision to form the governmentdikshit
Next Stories
1 गावी परत जा, अन्यथा दंगेखोरांचे फावेल
2 देवयानी खोब्रागडे यांना माफी मिळणार?
3 तरुण तेजपाल यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ
Just Now!
X