News Flash

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे ‘फादर ऑफ इंडिया’- डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख फादर ऑफ इंडिया असा केला आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं डोनाल्ड ट्रम्प यांनी तोंडभरुन कौतुक केलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती आहेत. भारतात सुरुवातीला वादावादी, हल्लकल्लोळाचं वातावरण होतं. मात्र तिथली परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप चांगल्या परिस्थितीने हाताळली. त्यांचा उल्लेख फादर ऑफ इंडिया असाच केला पाहिजे. याचं कारण त्यांनी भारतातील परिस्थिती एखाद्या वडिलधाऱ्या माणसासारखीच सांभाळली. आम्ही त्यांना फादर ऑफ इंडिया असंच म्हणू असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर एल्विस प्रेस्लीसोबतही मोदींची तुलना ट्रम्प यांनी केली.

“मला असं वाटतं की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे एकमेकांची भेट घेतील. त्यांच्या चर्चेतून सकारात्मक आणि चांगलं काहीतरी समोर येईल ” अशी अपेक्षाही ट्रम्प यांनी व्यक्त केली. न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत पाकिस्तानातील ISI आणि अल कायदा याबाबत ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा यावर योग्य तो उपाय पंतप्रधान नरेंद्र मोदी योजतील असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांचे ह्युस्टनमध्ये आल्याबद्दल आभार मानले आहेत. तसेच ट्रम्प हे माझेच मित्र नाहीत तर ते भारताचेही चांगले मित्र आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 10:57 pm

Web Title: well call pm narendra modi the father of india says us president donald trump in new york scj 81
Next Stories
1 “ईडी झालीय ‘ येडी ‘! मालकाचं ऐकून काहीही करु लागलीय”
2 महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
3 काश्मीरमध्ये परिस्थिती खूप वाईट, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिसले नाही – गुलाम नबी आझाद
Just Now!
X