झारखंड विधानसभा निवडणुकीच्या ८१ जागांसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार काँग्रेस स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. मात्र असे जरी असले तरी मुख्यमंत्री रघुवर दास यांनी भाजपाच झारखंडमध्ये सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. शिवाय, कल म्हणजे अंतिम शब्द नसतो, हे देखील त्यांनी सांगितले आहे.

झारखंडमधील जमशेदपुर (पूर्व) विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार, मुख्यमंत्री रघुवर दास व त्यांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या सरयू राय यांच्यात चुरशीची लढत होताना दिसत आहे. तर, राज्यातील निवडणुक निकालाबाबत अद्याप हाती आलेल्या कलावर प्रतिक्रिया देताना रघुवर दास यांनी कल म्हणजे अंतिम शब्द नाही, मतमोजणी अद्याप बाकी आहे. या कलावर अद्याप प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. मी नंतर रांची येथे पत्रकारपरिषद आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच, रघुवर दास यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी सरयू राय यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, सरयू राय यांच्याकडून कोणताही धोका नाही, मला अद्यापपर्यंत ती मतं मिळाली नाहीत, जी मला देण्यात आलेली आहेत. याचबरोबर आम्ही केवळ जिकणारच नाहीतर आम्ही राज्यात भाजपाच्या नेतृत्वात सरकार देखील स्थापन करू, असा देखील रघुबर दास यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना विश्वास व्यक्त केला.

आणखी वाचा – Jharkhand election: कोणत्याही मुख्यमंत्र्याला जनतेने सलग दुसऱ्यांना स्विकारले नाही; रघुबर दास अपवाद ठरणार?

झारखंड  राज्याच्या इतिहासात एकदा मुख्यमंत्री झालेली व्यक्ती सत्तेत असतानाच पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आलेली नाही. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री असलेले रघुवर दास याला अपवाद ठरतील का? हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

यापूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री असलेले बाबूलाल मरांडी, शिबू सोरेन, हेमंत सोरेन, अर्जुन मुंडा आणि मधु कोडा हे एकदा मुख्यमंत्री बनल्यानंतर पुन्हा पुढच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. अद्याप राज्यात असा कोणताही मुख्यमंत्री झाला जो सत्ता असताना पुन्हा एकाद निवडून आला आहे. सध्याचे मुख्यमंत्री असलेले रघुवर दास हे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा ७० हजार मताधिक्याने विधानसभेवर निवडणून आले होते.