News Flash

शस्त्रास्त्र तस्करी: दोन भावांना अटक

शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीचा छडा लावल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला असून, त्याअंतर्गत मंगळवारी केलेल्या कारवाईत दोन भावांना अटक केली आहे.खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी

| January 30, 2013 12:03 pm

शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीचा छडा लावल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला असून, त्याअंतर्गत मंगळवारी केलेल्या कारवाईत दोन भावांना अटक केली आहे.खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहनांची नियमित तपासणी करताना एका मोटरसायकलवरून जाणाऱ्या दोन भावांना शस्त्रास्त्रांची बेकायदेशीररीत्या वाहतूक करताना अटक केली. सुलेमान आणि समीर अशी अटक करण्यात आलेल्या भावांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ६ पिस्तुले, २० काडतुसे, ७.६५ एमएमची दोन पिस्तुले, ९ एमएम, १२ बोअरचे प्रत्येकी एक पिस्तूल आणि मोटरसायकल जप्त केली आहे. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या कुटुंबाशी हे दोघे संबंधित असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 12:03 pm

Web Title: weopen smuggler arrested
Next Stories
1 रॅगिंगप्रकरणी सात विद्यार्थी निलंबित
2 ‘विश्वरुपम’वरील बंदी हटविण्याविरोधात तमिळनाडू सरकारची याचिका
3 पाकिस्तानची ‘नस्ती उठाठेव’
Just Now!
X