फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी केलेल्या वक्तव्यानुसार अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेल करारासाठी निवडण्यात फ्रान्सचा काहीही सहभाग नव्हता. याचाच अर्थ अनिल अंबानी यांना हजारो कोटींचे कंत्राट मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करारात फेरफार केला होता.असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी दिलेल्या वक्तव्यानुसार त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षरित्या चोर म्हटले आहे. भारताच्या इतिहासात ही बाब बहुदा पहिल्यांदाच घडते आहे. यानंतरही पंतप्रधान सूचक मौन का बाळगलं असाही प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. संरक्षण मंत्री बोलतात आणि अरूण जेटली बोलतात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प आहेत असं का? असाही प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला.

एवढेच नाही तर अनिल अंबानी यांना ३० हजार कोटींचे कंत्राट फक्त नरेंद्र मोदींमुळे मिळाले. सामान्यांचा पैसा नरेंद्र मोदींनी अनिल अंबानी यांच्या खिशात घातला असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. यावरूनच स्पष्ट होते आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करारात भ्रष्टाचार केला असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

भारताच्या पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे त्यामुळे खरं काय आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सांगावं अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली. फ्रान्सच्या माजी अध्यक्षांनी आपल्या पंतप्रधानांवर आरोप केल्याने मला वाईट वाटते आहे असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. भारत सरकारने रिलायन्स डिफेन्स हे एकच नाव सुचवले त्यामुळे डसॉल्ट अॅव्हिएशनपुढे दुसरा पर्याय नव्हता असा दावा फ्रान्स्वा ओलांद यांनी केला. त्यावरूनच ही टीका करण्यात येते आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Were absolutely convinced that the prime minister of india is corrupt says rahul gandhi
First published on: 22-09-2018 at 15:36 IST