27 September 2020

News Flash

कोलकात्यातून ‘जेएमबी’च्या दोन दहशतवाद्यांना अटक

या दोघांकडून शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. 

संग्रहित छायाचित्र

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून ‘जमात- ऊल- मुजाहिद्दीन बांगलादेश’ या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.

मंगळवारी रात्री कोलकाता आणि मुर्शिदाबाद पोलिसांच्या संयुक्त पथकाने मुशिबूर रहमान (वय ३५) आणि राहुल अमिन (वय २६) या दोन दहशतवाद्यांना अटक केली. दोघेही जेएमबीचा नेता कौसरच्या संपर्कात होते, अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. यानुसार दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. दोघेही जेएमबीसाठी अॅसिड बॉम्ब तयार करायचे, अशी माहिती समोर येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2019 9:59 am

Web Title: west bangal kolkata stf murshidabad police arrested two jmb terrorist
Next Stories
1 मसूद अझहरनेच उघड केला पाकिस्तानचा खोटारडेपणा, ऑडिओ टेपमध्ये दिली हल्ल्याची कबुली
2 भारताचे चोख प्रत्युत्तर: पाकिस्तानी लष्कराच्या ५ चौक्या उद्ध्वस्त
3 जम्मू-काश्मीर : ‘एनआयए’कडून फुटीरतावाद्यांच्या घरावर छापेमारी
Just Now!
X