News Flash

अभिनेते मिथून चक्रवर्ती भाजपात करणार प्रवेश?; बंगाल प्रदेशाध्यक्षांची घेतली भेट

मोदींसोबत दिसणार व्यासपीठावर...

अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कैलास विजयवर्गीय यांची कोलकाता येथे भेट घेतली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्या भेटीमुळे ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचं नाव चर्चेत आलं होतं. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा आखाडा रंगात असतानाच सरसंघचालकांनी ही भेट घेतल्यानं मिथून चक्रवर्ती भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. त्यावर ही भेट कौटुंबिक होती असं मिथून यांनी म्हटलं होतं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज बंगालमध्ये प्रचारसभा घेणार असून, मिथून चक्रवर्ती यांनी बंगाल भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्यानं ते आज भाजपा प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आठ टप्प्यात मतदान होणार असून, उमेदवारांच्या नावांचीही घोषणा केली जात आहे. त्यामुळे आता बंगालमध्ये प्रचाराचा पारा वाढताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (०७ मार्च) पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून, ते कोलकातामध्ये प्रचारसभेला संबोधित करणार आहे. याचदरम्यान अभिनेते मिथून चक्रवर्ती त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

मिथून चक्रवर्ती यांनी बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीची माहिती विजयवर्गीय यांनी ट्विट करून दिली. मोदी आज कोलकातात असतानाच मिथून चक्रवर्ती यांनी पूर्वसंध्येला भेट घेतल्यानं ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे मिथून चक्रवर्ती हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत एकाच व्यासपीठावर असण्याची शक्यता आहे. एका भाजपा नेत्यानं पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली आहे.

मोहन भागवत यांच्या मुंबईतील भेटीपासूनच मिथुन चक्रवर्ती पुन्हा राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, “भागवत यांच्यासोबतची भेट कौटुबिक होती. खूप दिवसांपासून आम्हाला भेटायचं होतं. पण कार्यक्रमामुळे भेटता येत नव्हतं. भागवत यांनी आज माझ्या घरी नाश्ता केला. त्याचबरोबर मलाही सहकुटुंब नागपूरला बोलावलं आहे,” असं उत्तर मिथून यांनी दिलं होतं. २०११ मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूलने त्यांना राज्यसभेवर पाठवल होतं. मात्र, २०१६ मध्ये मिथुन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय सन्यास घेतला होता. मात्र, भागवत यांच्या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती भाजपात प्रवेश करुन पुन्हा एकदा राजकारणात पाऊल ठेवणार असल्याच्या चर्चेनं डोकं वर काढलं. त्यावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 8:56 am

Web Title: west begnal election mithun chakraborty may be join bjp actor meets kailash vijayvargiya in kolkata bmh 90
Next Stories
1 “आज देशाची परिस्थिती ‘आणीबाणी बरी होती’ असं म्हणावं अशीच”
2 पाकव्याप्त काश्मीरमधील उमेदवारांमुळे निवडणूक रद्द
3 प. बंगालमध्ये भाजपची ५७ उमेदवारांची पहिली यादी
Just Now!
X