20 September 2020

News Flash

रसगुल्ला मूळ बंगालचा की ओडिशाचा?

पश्चिम बंगालमधील रसगुल्ला या मिठाईला भौगोलिक ओळख (जिऑग्राफिकल स्टेटस) मिळण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने पावले उचलली आहेत.

| August 27, 2015 03:23 am

पश्चिम बंगालमधील रसगुल्ला या मिठाईला भौगोलिक ओळख (जिऑग्राफिकल स्टेटस) मिळण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने पावले उचलली आहेत. रसगुल्ला या मिठाईचे मूळ उगमस्थान कोणते यावरून वाद सुरू झाल्यानंतर आता राज्य सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान खात्याने केंद्राच्या याच खात्याशी संपर्क साधला आहे. रसगुल्ला ही मूळ बंगाली मिठाई असल्याचा सरकारचा दावा आहे. रसगुल्ला मूळ बंगालचा की ओडिशाचा असा वाद आता सुरू झाला आहे.
पश्चिम बंगो मिस्तानो ब्यावसायी समितीचे प्रवक्ते जगन्नाथ घोष यांनी सांगितले की, आमच्या शिष्टमंडळास महिला व बालकल्याण मंत्री शशी पांजा यांनी त्याबाबत आश्वासन दिले आहे. आमच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रसगुल्ल्याचे मूळ बंगालमध्येच असल्याचे सिद्ध करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. १८६८ मध्ये नबीन चंद्र दास यांनी १८६८ मध्ये या मिठाईचा शोध लावला होता, त्यामुळे हा वारसा आम्ही हातचा जाऊ देणार नाही. के.सी.दास प्रा.लिचे संजय दास हे नबीनचंद्र दास याच्या पाचव्या पिढीतील असून दास कुटुंबानेच रसगुल्ले प्रथम तयार केले. जर या मिठाईला भौगोलिक दर्जा मिळाला तर शहरालाही त्याचा फायदा होईल. बाघबझार भागात पूर्वी रसगुल्ले कोळशाच्या शेगडीवर तयार केले जात असत आता ते नवीन तंत्राने बनवून थेट पत्र्याच्या डब्यात पॅकेजिंग करूनच बाहेर येतात व ते भारताबाहेरही पाठवले जातात. जर रसगुल्ल्यास मान्यता मिळाली तर त्याचे पेटंटही घेता येईल. संजय दास यांनी सांगितले की, रसगुल्ला बंगालचा आहे व त्यात आमची ओडिशाबरोबर स्पर्धा नाही. ओडिशाची छन्नापोरा ही मूळ मिठाई आहे. सर्व राज्यांनी त्यांची भौगोलिक ओळख जपावी. ओडिशाने असा दावा केला आहे की, रसगुल्ला प्रथम पुरी येथील जगन्नाथ मंदिरात धार्मिक समारंभाच्यावेळी तयार करण्यात आला व हा शोध बाराव्या शतकात लावण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 3:23 am

Web Title: west bengal and odisha battle over the invention of rasgulla
Next Stories
1 राष्ट्रपती भवनाला दिल्ली पालिकेकडून ८० नोटिसा
2 बिहार पॅकेज म्हणजे जुन्याच योजना!
3 जीवनशैलीसंदर्भातील विकारांवर मात करणे शक्य?
Just Now!
X