पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीने गड राखला असून तृणमूल काँग्रेस तिसऱ्यांदा सत्तेत आली आहे. मात्र ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम विधानसभेत पराभव झाला असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांना भाजपाच्या शुभेंदु अधिकारी यांनी त्यांना पराभूत केलं आहे. शेवटच्या फेरीपर्यंत या दोघांमध्ये चुरस रंगली होती.मात्र शेवटच्या फेरीत फासे उलटे पडले आणि ममता दीदींचा पराभव झाला. त्यामुळे सत्ता आली तरी ममता दीदींना पराभवाची सळ राहणार आहे. पराभवाचा निकाल येण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांत त्यांनी मतदारांचे आभार मानले. तसेच केंद्र सरकार आणि भाजपावर हल्लाबोल केला.

‘केंद्र सरकारच्या अथक प्रयत्नानंतरही आपला विजय झाला आहे. हा बंगाल आहे आणि बंगालमधील जनतेचा विजय आहे. बंगालच्या जनतेने देश वाचवला आहे. मी सांगितलं होतं आम्ही द्विशतक ठोकू. या विजयामुळे बंगालमधील जनता वाचली आहे. आम्ही सांगितलं होतं खेलो हौबे आणि शेवटी विजय आपलाच झाला’ असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

निरोप घेतो आता! बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर ‘या’ व्यक्तीचा राजकारणाला रामराम

‘नंदीग्राममधील पराभव मी स्वीकारला आहे. नंदीग्राममध्ये काय झालं विसरून जा. आमच्या पक्षानं बहुमतांना निवडणूक जिंकली आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार’, असं त्यांनी सांगितलं.

पश्चिम बंगालमधल्या आऱामबागच्या भाजपा कार्यालयाला आग; तृणमूलने फेटाळले आरोप

करोना संकट पाहता ममता बॅनर्जी यांनी कार्यकर्त्यांना विजयी जल्लोष न करण्याची विनंती केली आहे. तसेच ग्रामीण बंगालमधील फुटबॉल क्लबना ५० हजार फुटबॉल वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ममता दीदींच्या पायावरील प्लास्टर काढण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मास्क लावण्याची विनंती केली. तसेच शांततेत घरी जाण्याचं आवाहन केलं.