West Bengal Assembly Elections 2021: देशातील पाच राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. दरम्यान पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान ७ मार्चला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश करताच मिथुन चक्रवर्ती यांनी आपम कोब्रा असल्याचा उल्लेख केला. त्यांचा हा डायलॉग सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला असून चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत स्वत:ला कोब्रा साप का म्हटलं याचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी क्रोबा, एक दंशही पुरेसा; भाजपात दाखल होताच मिथून चक्रवर्तींचा इशारा

मिथुन चक्रवर्ती यांनी मुलाखतीवेळी सांगितलं की, “करोना काळात आपण बंगळुरुत अडकलो होतो. याचवेळी माझ्या वडिलांचं निधन झालं, पण आण करोनाच्या नियमांचं उल्लंघन केलं नाही. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी आपण उपस्थित नव्हतो आणि गरिबांची मदत करत होतो”.

प. बंगालमध्ये परिवर्तन- मोदी

“मी जेव्हापासून कोब्रा असल्याचं म्हटलं आहे तेव्हापासून हा डायलॉग ट्रेंडमध्ये आहेत. मिथुनदाने असं कसं काय म्हटलं असा लोक विचार करत आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की, माझ्याबद्दल बोलताना ‘इथे मारलं तर स्मशानात मृतदेह दिसेल’ सांगितलं जायचं. पण त्यांच्या वक्तव्यावरुन वाद झाला नाही, पण जेव्हा मी कोब्रा होऊन दंश देईल म्हटलं तर लगेच सुरु झाला,” असं मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, “आजकाल सर्वच नेते काही ना काहीतरी बोलत असतात. म्हणून मी पण एक डायलॉग वापरला”.

मिथुन चक्रवर्ती काय म्हणाले होते –
मिथून चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आलेल्या कोलकातातील ब्रिगेड मैदानातील व्यासपीठावर भाजपात प्रवेश केला. यावेळी समर्थक जोरदार प्रतिसाद देत असताना मिथुन यांनी त्यांच्या चित्रपटातील संवाद म्हणून दाखवला. “आमी जोलधारो नोई, बेले बोराओ नोई, अमी एकता कोब्रा एक चोबोल एइ चोबी”. (घातक नसलेला साप मला समजू नका, मी कोब्रा आहे. कुणालाही एका डंखात मारू शकतो.)

२०११ मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूलने त्यांना राज्यसभेवर पाठवल होतं. मात्र, २०१६ मध्ये मिथुन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय संन्यास घेतला होता. मात्र, भागवत यांच्या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती भाजपात प्रवेश करुन पुन्हा एकदा राजकारणात पाऊल ठेवणार असल्याच्या चर्चा सुरू झाली होती. भाजपात प्रवेश करत मिथुन यांनी बंगालच्या राजकारणात पाऊल ठेवलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal assembly elections bjp bollywood actor mithun chakraborty cobra remark sgy
First published on: 09-03-2021 at 10:07 IST