News Flash

करोना संकटात पश्चिम बंगालमध्ये आज सातव्या टप्प्यासाठी मतदान

केंद्रीय दलाच्या ७९६ तुकड्या राज्यात तैनात

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. सातव्या टप्प्यात ३६ जागांसाठी मतदान होणार असून ८१ लाख मतदार मतदानासाठी पात्र आहेत. मतदानात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने केंद्रीय दलाच्या ७९६ तुकड्या राज्यात तैनात केल्या आहेत. मतदानावेळी करोनाच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल.

भाजपा आणि तृणमूल काँग्रेसकडून जोरदार प्रचारमोहीम राबवण्यात आल्यानंतर सातव्या टप्प्यात मात्र करोनामुळे प्रचंड थंडावला होता. करोना रुग्ण वाढल्याने निवडणूक आयोगाने काही निर्बंध आणले आहेत. प्रचारादरम्यान करोनाच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याने निवडणूक आयोगाने रोड शो तसंच वाहनांसोबत रॅली काढण्यावर बंदी आणील. तसंच ५०० हून अधिक लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी आणली. यासोबत दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीदेखील आपल्या सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

मोदींचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं असून यावेळी करोनाच्या नियमांचं पालन करण्याची विनंती केली आहे.

सातव्या टप्प्यात अनेक महत्वाच्या जागांवर मतदान होणार असून यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचं निवासस्थान असलेला आणि मतदारसंघ राहिलेल्या भवानीपूरचा समावेश आहे. ममता बॅनर्जी यांनी यावेळी नंदीग्राममधून निवडणूक लढत आहेत. पक्षाचे नेते सोभानदेब चट्टोपाध्याय यांच्यावर त्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून विजयाची हॅटट्ट्रीक करण्याच संधी आहे.

पश्चिम बंगालमध्ये शनिवारी सर्वाधिक १४ हजार २८१ नव्या रुग्णांची नोंद झाली. यासोबत राज्यातील करोनाबाधित रुग्णसंख्या ७ लाख २८ हजार ६१ वर पोहोचली. तर मृतांची संख्या १० हजार ८८४ इतकी झाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी आठवा आणि शेवटचा टप्पा पार पडणार आहे. २ मे रोजी पश्चिम बंगालसोबत आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील निवडणूक निकाल जाहीर होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 8:19 am

Web Title: west bengal assembly elections voting for 34 seats in 7th phase sgy 87
Next Stories
1 Oscar 2021: ऑस्कर 2021 पुरस्कारांमध्ये ‘नोमडलँड’ची वर्णी, सर्वोत्कृष्ट सिनेमासह, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि दिग्दर्शकाचा पुरस्कार
2 भारतामध्ये लशींच्या किमती तुलनेत अधिक
3 ‘पीएम केअर्स’ निधीतून ५५१ प्राणवायू प्रकल्प
Just Now!
X